जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑगस्ट २०२१ । ग्रामपंचायत कार्यालय खडकी बुद्रुक येथे शांतता समितीची बैठक काल गावाचे प्रथम नागरिक सरपंच सचिन पवार यांचे अध्यक्षतेखाली तर चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ शाल देऊन सत्कार करण्यात आला.
आगामी कालखंडात येणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव दहीहंडी पोळा,आदी सणांच्या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या संदर्भात मार्गदर्शक सूचना देण्यासाठी शांतता समितीची बैठक बोलावण्यात आली होती.
यावेळी उपस्थितांनी गावाची संपूर्ण माहिती,समाज निहाय संख्या,भौगोलिक परिस्थिती लक्षात आणून दिली.
पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांनी सार्वजनिक सण,उत्सव साजरे करण्या संदर्भात मार्गदर्शक सूचना दिल्या. गावात कुठल्याही प्रकारचे अनुचित प्रकार,वाद-विवाद होऊ नये यासाठी सर्वांनी एकजुटीने राहून प्रयत्न करावेत.कोरोणा पासून गावकऱ्यांनी स्वतःचा बचाव करावा असे आवाहन केले. गावात कोणी विघ्नसंतोषी कृत्य करणारे असेल तर त्यांच्या बाबत पोलीस ठाण्यात माहिती द्यावी. त्यांचा कायद्याचा बडगा उगारून बंदोबस्त करू असेही त्यांनी आवर्जून सांगितले.”एक गाव एक गणपती” साजरा करावा.
तसेच दहीहंडी साजरी करताना सुद्धा योग्य ती खबरदारी घ्यावी.असे देखील गावकर्यांना सांगितले. यावेळी ए.पी.आय. ढिकले, बीट अंमलदार अशोक मोरे, पंढरीनाथ पवार, पाटखडकी पोलीस पाटील सौ.मनीषा मराठे उपसरपंच सो,व सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य,विकास सोसायटीचे सन्माननीय चेअरमन सो,व्हाईस चेअरमन व सर्व संचालक मंडळ,म.ग्रामविकास अधिकारी सो, तलाठी, कृषी सहाय्यक,आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका,आशा सेविका गावातील सर्व माजी सैनिक,माजी सरपंच,सर्व माजी ग्रामपंचायत सदस्य,सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी,गणपती,नवरात्र, दहीहंडी शिवजयंती,भीम जयंती, पिर मुसा कादरी बाबा उत्सव, अशा सर्व उत्सव समित्यांचे प्रातिनिधिक पदाधिकारी,खडकी बुद्रुक आणि पाटखडकी गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक,माताभगिनी आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन धनंजय मांडोळे यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन पाटखडकीच्या पोलीस पाटील सौ.मनीषा मराठे यांनी केले.