fbpx

ग्रंथपाल पदभरतीसाठीचा शासन निर्णय काढा, अन्यथा…महासंघाचा इशारा

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जुलै २०२१ । गेल्या १० वर्षापासून राज्यातील अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयातील पदभरती प्रक्रिया ही वेगवेगळ्या कारणाने रेंगाळली आहे. त्यात ग्रंथापाल पदाचाही समावेश आहे. 

११ ऑगस्टपर्यंत शासनाने भरती प्रक्रिया सुरु करण्यासाठी शासन निर्णय काढला नाही तर १२ ऑगस्टपासून जळगावसह राज्यातील दहा उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघतर्फे सहसंचालकांना निवेदन देऊन देण्यात आला आहे.

अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयातील ग्रंथापालांची पदभरती सुरु करावी व ४ मे २०२० रोजी पदभरतीवर निर्बंध लादण्याअगोदर ज्या महाविद्यालयांना शासन नियमानुसार भरतीची परवानगी मिळाली आहे. अशा महाविद्यालयांना तेथील पदाच्या मुलाखतीसाठी तातडीने परवानगी द्यावी. तसेच खासगी विनाअनुदानित संस्थेमधील ग्रंथापालांची नियुक्ती विद्यापीठ नियमांना अधीन राहून वेतन श्रेणीनुसार करण्यात यावी. या मुख्य मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघाच्या वतीने बेमुदत साखळी उपोषण आंदोलन केले जाणार आहे. 

ग्रंथपाल महासंघातर्फे १२ ऑगस्ट रोजी जळगाव सहसंचालक कार्यालयासमोर जो पर्यंत शासन निर्णय निघणार तो पर्यंत बेमुदत साखळी उपोषण करण्यात येणार आहे. या संदर्भात उच्च शिक्षण जळगाव विभागाचे सहसंचालक डॉ. संतोष चव्हाण यांना मंगळवारी निवेदन देण्यात आले. या वेळी ग्रंथपाल महासंघाचे डॉ. एस. एस. साळुंके, प्रीती पाटील अादी उपस्थित होत्या.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज