fbpx

आनंदाची बातमी : जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाच्या दूध खरेदी दरात वाढ

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १ सप्टेंबर २०२१ । कोविड काळात झालेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी दूधसंघाने एक मोठा निर्णय घेतला असून, दूध उत्पादकांकडून खरेदी करण्यात येणाऱ्या दुधाच्या खरेदी दरात वाढ केली आहे.

खरेदी दरात वाढ झाली असली तरी ग्राहकांच्या दृष्टीने आनंदाची बातमी म्हणजे दूध व दुग्धजन्य पदार्थ्यांच्या विक्रीच्या दरात कोणीतीही दरवाढ करण्यात आलेली नाही.

आता नवीन खरेदी दरवाढीनुसार गायीचे दूध (गुणवत्ता ३.५ /८.५ टक्के) प्रतिलिटर एक रुपया तर म्हैस दूध (६.०/९.० टक्के गुणवत्ता) खरेदीत प्रतिलिटर ३ रुपये दरवाढ करण्यात आली आहे.

सद्यस्थितीत जळगाव जिल्हा दूध संघाचे प्रतिदिन २ लाख लिटर दूध संकलन असून, या खरेदी दरवाढीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील दूध उत्पादकांना दरमहा सुमारे १ कोटी रुपये अतिरिक्त अदा करण्यात येणार आहेत. ही खरेदी दरवाढ दि. १ सप्टेंबरपासूनच लागू करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज