शालेय विद्यार्थ्यांसाठी खुशखबर… दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑक्टोबर २०२१ । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक अशा सर्व शाळांना दिवाळीची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबरपर्यंत म्हणजे एकूण १४ दिवसांची सुट्टीची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. या काळात शाळांकडून सुरु असलेले ऑनलाईन अध्यापनही बंद राहणार आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे.

राज्यातील इयत्ता १ ली ते १२ वीच्या शाळांना विविध धार्मिक सण, उत्सावासाठी सुट्ट्या घोषित करण्यात येत असतात. त्यानुसार २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात दिवाळी सणाच्या अनुषंगाने राज्यातील शाळांना २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत सुट्टी घोषित करण्यात आली आहे. या कालावधीत शाळांमार्फत घेण्यात येणारे ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने सुरु असलेले अध्यापनाचे कामकाज बंद राहणार आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज