⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | वाणिज्य | Gold-Silver : रेकॉर्ड पातळीवरून सोन्याची किंमत 5,000 रुपयाने घसरली, वाचा प्रति १० ग्रॅमचा दर

Gold-Silver : रेकॉर्ड पातळीवरून सोन्याची किंमत 5,000 रुपयाने घसरली, वाचा प्रति १० ग्रॅमचा दर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जून २०२२ । जागतिक बाजारातील नकारात्मक संकेतांच्या पार्श्वभूमीवर आज सलग दुसऱ्या दिवशी सोने भावात वाढ झाली आहे. मात्र दुसरीकडे चांदीच्या दरात घसरण झाली आहे. जळगाव सराफ बाजारात आज १० ग्रॅम सोन्याच्या भावात ९० रुपयाची वाढ झाली आहे. तर चांदीच्या भावात २२० रुपयाची घसरण झाली आहे. त्यापूर्वी कालच्या सत्रात सोने १०० रुपयाने महागले होते. तर चांदी ६० रुपयांनी स्वस्त झाली होती. दरम्यान, रेकॉर्ड पातळीवरून सोन्याचा भाव 5,000 हून अधिकने घसरला आहे.

आज जळगाव सराफ बाजारात सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ५२,२५० रुपयावर पोहोचला आहे. तर चांदीचा प्रति किलोचा दर ६३,४८० रुपयावर आला आहे. सोन्याचे दर दिवसातून दोनदा जाहीर केले जातात. त्यामुळे सोन्याच्या दरात तफावत पहायला मिळते.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

सोने आणि चांदीच्या भावात मागील काही दिवसापासून चढ-उतार सुरूच आहे. करोना काळात सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी वाढ झाली होती. ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याचा भाव ५६,२०० रुपयांवर गेला होता. त्यातुलनेत सोनं जवळपास ५००० रुपयांनी स्वस्त झाले आहे. दरम्यान, रिझर्व्ह बँकेकडून बुधवारी पतधोरण जाहीर केले. यात बँकेने रेपो दरात ०.५० टक्के वाढ केली आहे. यामुळे रिझर्व्ह बँकेचा रेपो दर ४.९० टक्के झाला आहे. महिनाभरात दुसऱ्यांदा व्याजदर वाढ झाल्याने कर्जदारांना जोरदार झटका दिला आहे.

चार दिवसात सोने दोन वेळा स्वस्त दोन वेळा महागले आहे. तर चांदी तीन वेळा स्वस्त तर एक वेळा महागली आहे. चार दिवसात सोने किंचित १०० ते १२५ रुपयांनी महागले आहे. दुसरीकडे चांदी ३०० ते ३५० रुपयांनी घसरली आहे. यापूर्वी गेल्या आठवड्यात सोने ३०० ते ३५० रुपयांनी महागले आहे. चांदी देखील ३०० ते ३५० रुपयांपर्यंत महागली आहे.

या आठवड्यात सोन्याचे दर किती बदलले
६ जून २०२२- रुपये ५२,१६० प्रति १० ग्रॅम
७ जून २०२२ – रुपये ५२,०६० प्रति १० ग्रॅम
८ जून २०२२ – रु ५२,१६० प्रति १० ग्रॅम
९ जून २०२२ – रु ५२,२५० प्रति १० ग्रॅम

गेल्या आठवड्यात चांदीचा दर किती बदलला
६ जून २०२२- रुपये ६३,११० प्रति किलो
७ जून २०२२ – रुपये ६३,७६० प्रति किलो
८ जून मे २०२२- रुपये ६३,७०० प्रति किलो
९ जून मे २०२२- रुपये ६३,४८० प्रति किलो

शुद्धता कशी ओळखावी
सोने खरेदी करायला गेल्यास २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्यावर ९९९ लिहिलेले असेल. 23 कॅरेट सोन्यावर 995 आणि 22 कॅरेटवर 916 लिहिले आहे. 18 कॅरेटवर 750 लिहिले आहे तर 14 कॅरेटवर 585 लिहिले आहे. 999 शुद्धता असलेली चांदी सर्वात शुद्ध मानली जाते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.