fbpx

सोन्यात पुन्हा तेजी… चांदीचा भाव गडबडला…

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ एप्रिल २०२१ । गेल्या काही दिवसांपासून गडबडणाऱ्या सोन्याच्या भावात आज तेजी पाहायला मिळत आहे. २४ कॅरेट सोन्याच्या भावात १०४ रुपयांनी वाढ होऊन आज जळगाव शहरात १० ग्रामसाठी ४५ हजार ६५० रुपये मोजावे लागत आहे.

याउलट चांदीच्या भावात मंदी दिसून येत असून चांदीचा भाव ४ हजार ९०० रुपयांनी कमी होऊन प्रति किलो चांदीचा भाव ६५ हजार रुपये झाला आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्राम ४ हजार ३४८ रुपये आहे. १० ग्रामसाठी तुम्हाला ४३ हजार ४८० रुपये मोजावे लागतील. २२ कॅरेट सोन्याच्या भावात १०४ रुपयांची घाट झाली आहे.

२४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्राम ४ हजार ५६५ रुपये आहे. तर १० ग्रामचा भाव ४५ हजार ६५० रुपये असून तो कालपेक्षा १०४ रुपयांनी अधिक आहे.

 

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज