जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मे २०२२ । आजचे सोने आणि चांदीचे दर जाहीर झाले आहे. दरम्यान, आज मंगळवारी जळगाव सराफ बाजारात सोन्याच्या भावात कोणताही बदल झालेला नाहीय. आज सोने जैसे थे आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरात मात्र घसरण झाली आहे. आज चांदीचा प्रति किलोचा दर २४० रुपयांनी घसरला आहे. यापूर्वी काल सकाळच्या सत्रात सोने किंचित ५० रुपयाने तर चांदी ३३० रुपयांनी महागली.
जळगावातील सोने-चांदीचा भाव?
आज मंगळवारी जळगाव सराफ बाजारात सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ५२,११० रुपयावर पोहोचला आहे. तर चांदीचा प्रति किलोचा दर ६३,३३० रुपयावर आला आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)
आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे मागील दोन आठवड्यापासून सोन्याच्या (Gold Rate) भावात वाढ दिसून आलीय. सोबतच चांदीच्या (Silver Rate) भावात देखील वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात सोने जवळपास ४०० ते ५०० रुपयाने महागले आहे. तर चांदी २०० ते ३०० रुपयांनी महागली आहे. दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच १ मे रोजी सोन्याचा भाव ५२,५०० रुपये प्रति तोळा इतका होता. तर चांदीचा प्रति किलोचा दर ६५,५०० रुपयापर्यंत होता.
या महिन्याच्या मध्यंतरी सोन्याचा भाव ५१ हजारांवर आला होता. तर चांदी ६० हजार रुपयांवर आली होती. मात्र मागील काही दिवसापासून सोने आणि चांदीचे भाव पुन्हा वाढताना दिसून आले. १६ मे रोजी ५१ हजार रुपयांवर असलेला सोन्याचा भाव आज ५२ हजारांवर आहे. म्हणजेच गेल्या १५ दिवसात सोने १२०० रुपयांनी महागले आहे. तर १५ मे रोजी चांदीचा प्रति किलोचा दर ६० हजार रुपयावर होता तो आज ६३ हजार ४०० रुपयावर आहे. चांदी देखील १५ दिवसात तब्बल ३४०० रुपयांनी महागली आहे.
गेल्या आठवड्यात सोन्याचे दर किती बदलले
२३ मे २०२२- रुपये ५२,०२० प्रति १० ग्रॅम
२४ मे २०२२ – रुपये ४२,१०० प्रति १० ग्रॅम
२५ मे २०२२ – रु ५२,३६० प्रति १० ग्रॅम
२६ मे २०२२ – रु ५२,०१० प्रति १० ग्रॅम
२७ मे २०२२ – रु ५२,०६० प्रति १० ग्रॅम
२८ मे २०२२ – बाजार बंद
गेल्या आठवड्यात चांदीचा दर किती बदलला
२३ मे २०२२- रुपये ६२,८५० प्रति किलो
२४ मे २०२२ – रुपये ६२,७४० प्रति किलो
२५ मे २०२२- रुपये ६३,४३० प्रति किलो
२६ मे २०२२- रुपये ६२,९८० प्रति किलो
२७ मे २०२२- रुपये ६२,२४० प्रति किलो
२८ मे २०२२- बाजार बंद
शुद्धता कशी ओळखावी
सोने खरेदी करायला गेल्यास २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्यावर ९९९ लिहिलेले असेल. 23 कॅरेट सोन्यावर 995 आणि 22 कॅरेटवर 916 लिहिले आहे. 18 कॅरेटवर 750 लिहिले आहे तर 14 कॅरेटवर 585 लिहिले आहे. 999 शुद्धता असलेली चांदी सर्वात शुद्ध मानली जाते.