fbpx

आजचा सोने – चांदीचा भाव ; ३० जून २०२१

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जून २०२१ । मागील काही दिवसांपासून जळगाव सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी चढ उतार दिसून आलीय. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात  ५६२०० रू.विक्रमी पातळीवर गेलेले सोने आता ४८ हजाराच्या आत आले आहे. आज बुधवारी सोन्याचा दर स्थिर आहे. तर चांदी ३०० रुपयांनी स्वस्त झाली आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर रुपयाच्या तुलनेत डॉलरचा भाव वधारल्याने त्याचा थेट परिणाम सोन्याच्या किंमतीवर पाहायला मिळत आहे. जळगाव सराफ बाजारात मागील गेल्या काही दिवसात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोने दर ४८ हजाराच्या आत आले आहे. 

आजचा सोन्याचा भाव

२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ४,७४९ रुपये इतका आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४७,४९० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम १ ग्रॅम चा दर ४५२३ रुपये असून १० ग्रॅमचा सोन्याचा भाव ४५,२३० रुपये आहे.

 चांदीचा भाव

तर आज चांदीच्या भावात ३०० रुपयाची घट झाली आहे. त्यामुळे आज चांदीचा एक किलोचा भाव ७३,२०० रुपये इतका आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज