⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

सोने आणि चांदी झाली स्वस्त : तपासा आजचे जळगावातील नवीन दर

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मे २०२१ । जळगावातील सुवर्णबाजारात मागील काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या दरात पडझड दिसून आली. काल गुरुवारी दोन्ही धातूंमध्ये मोठी वाढ झाली होती. तर आज शुक्रवारी सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. आज सोने २१० रुपयांनी तर चांदीमध्ये १३०० रुपयांची घसरण झाली आहे.

सोन्याचा भाव

२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ४,९४९ रुपये झाला आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४९,४९० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम भाव ४,७१३ रुपये इतका आहे. तर १० ग्रामसाठी तुम्हाला ४७,१३० रुपये मोजावे लागतील.

चांदीचा भाव 

आज चांदीच्या भावात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. आज १ ग्राम चांदीचा भाव आज ७६ रुपये इतका असून १ किलोचा दर ७६,००० रुपये इतका आहे.