⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

Gold-Silver Rate : सोने-चांदी खरेदी करण्याआधी जाणून घ्या आजचा भाव, २५ डिसेंबर २०२१

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ डिसेंबर २०२१ । जगभरात कोरोनाच्या नवा व्हेरिएंट ओमिक्राॅनचे (Omicron) रुग्ण आढळून आल्याने दहशत पसरली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कठोर निर्बंधांच्या दिशेने अर्थव्यवस्था सरकू लागली आहे. या पार्श्वभूमीवर सराफ बाजारात सोने (Gold) आणि चांदीच्या (Silver) भावात चढ-उतार दिसून येतोय. आगामी काळात सोन्याचे दर पुन्हा वाढणार असल्याने सांगितले जात आहे. जळगाव सराफ बाजारात सध्या १० ग्रॅम सोने ४९,२८० रुपये इतके आहे. तर चांदी प्रति किलो ६३,७७० रुपये इतके आहे. या आठवड्यात सोन्याचे दर कमी झाल्याचे दिसून आले आहे.मात्र दुसरीकडे चांदी किंचित वाढली आहे.

जळगाव सराफ बाजारात काल आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोने किंचित स्वस्त झाले तर चांदी महागली होती. सोने ५० रुपयाने स्वस्त झाले होते तर चांदी १३० रुपयाने महागले होते. त्यामुळे १० ग्रॅम सोने ४९,२८० रुपये इतके आहे. तर चांदी प्रति किलो ६३,७७० रुपये इतके आहे.

सध्या भारतासह १०० हुन अधिक देशांमध्ये ओमिक्राॅनचे रुग्ण आढळून आले आहे. ओमिक्राॅनचे रुग्ण वाढत असल्याने गुंतवणूकदार धास्तावले आहेत. नजीकच्या काळात पुन्हा निर्बंध लागण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. त्यापार्श्वभूमीवर सोने आणि चांदीचे दर पुन्हा वाढू शकतात. जळगाव सराफ बाजारात गेल्या ५ दिवसात सराफ बाजारात सोने ४ वेळा स्वस्त झालं आहे. तर दुसरीकडे चांदी २ वेळा स्वस्त तर तीन वेळा महागले आहे.

या आठवड्यातील सोने चांदीचे दर?

२० डिसेंबर (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,७३० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६३,५९० रुपये असा होता. २१ डिसेंबर (मंगळवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,३७० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६२,८६० रुपये इतका नोंदविला गेला. २२ डिसेंबर (बुधवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,१९० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६३,२५० रुपये इतका नोंदविला गेला. २३ डिसेंबर (गुरुवारी) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,३३० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६३,६५० रुपये इतका नोंदविला गेला. २४ डिसेंबर (शुक्रवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,२८० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६३,७७० रुपये इतका नोंदविला गेला.

हे देखील वाचा :