fbpx

आजचा सोने आणि चांदीचा दर : २४ जून २०२१

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २४  जून २०२१ । कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लावण्यात आलेल्या राज्यातील लॉकडाऊनमध्ये १ जुलैपासून सूट मिळतातच सोने आणि चांदीच्या दरात मोठी चढ-उतार दिसून आली आहे. मागील आठवड्यात सोन्याच्या दरात दीड हजार रुपयांपेक्षा अधिकने कमी झालेत.

दरम्यान, आज सोन्याचा दर स्थिर आहे. तर चांदी महागली आहे. आज चांदी २०० रुपयांनी महागली आहे. त्यापूर्वी काल सोन्याच्या दरात प्रति १० ग्रम २१० रुपयां वाढ झाली होती. तर आज चांदीत १०० रुपयाची वाढ झाली होती.

आजचा सोन्याचा भाव

२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ४,७६० रुपये इतका आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४७,६०० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम १ ग्रॅम चा दर ४५३३ रुपये असून १० ग्रॅम चा ४५,३३० रुपये आहे.

 चांदीचा भाव

आज चांदीच्या भावात २०० रुपयाची वाढ झाली आहे.त्यामुळे आज चांदीचा एक किलोचा भाव ७३,४०० रुपये इतका आहे.

आगामी काळात सोने चांदीचे दर कसे असणार?

तज्ज्ञांच्या मते, “भारतात सध्या कोणताही उत्सव किंवा सण नाही. याशिवाय खरेदी विक्रीचा लग्नाचा काळही संपलाय. तसेच सोन्यावरील हॉलमार्किंगचे नियम लागू झालेत. या सर्वांचा सोन्याच्या बाजारावर परिणाम झालाय. त्यामुळे आगामी काळात सोने आणि चांदीचे दर स्थिर राहतील किंवा कमी होतील.

भारतातील गुंतवणूकदार सध्या सोने चांदीच्या किमती आणखी कमी होण्याची वाट पाहत आहेत. त्यामुळे सोने दरात जशी वेगाने पडझड होईल तशी गुंतवणूक वाढून या किमती पुन्हा वेगाने वाढतील. त्या परिस्थितीत सोन्याच्या दरात थोडीशी सुधारणा होईल. मात्र, सध्यातरी तशी कोणतीही स्थिती नाही. चांदीच्या दरातही अशाचप्रकारे वाढ होताना दिसेल. बाजार खुले झाल्यास चांदीची औद्योगिक मागणी वाढेल. त्यामुळे चांदीचे दरही वाढतील.”

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज