fbpx

सोने-चांदी पुन्हा महागली ; तपासा आजचे जळगावातील नवे दर

जळगाव लाईव्ह न्यूज । २३  जून २०२१ । मागील काही दिवसापासून सुरु असलेल्या सोन्याच्या घसरणीला आज ब्रेक लागला आहे. आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. सोबतच चांदीचा भाव देखील वधारला आहे. आज सोने प्रति १० ग्रम २१० रुपयांनी वाढले आहे. तर चांदीच्या भावात १०० रुपयाची वाढ झाली आहे.

जून महिन्याच्या सुरुवातीपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर अस्थिर झाला आहे. मागील काही दिवसापासून सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. या घसरणीमुळे जळगावमध्ये सोन्याचे दर तब्बल दीड हजार रुपयांपेक्षा अधिकने कमी झालेत. त्यामुळे सोने ४८ हजार रुपयांच्या घरात गेले आहे. सध्या लग्नसराई जवळपास आटोपली आहे. त्यामुळे सोन्याला मागणी नाही. याच कारणामुळे सोन्याचे दर कमी होत आहेत.  

 आजचा सोन्याचा भाव

२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ४,७६० रुपये इतका आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४७,६०० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम १ ग्रॅम चा दर ४५३३ रुपये असून १० ग्रॅम चा ४५,३३० रुपये आहे.

GRF Advt

 चांदीचा भाव

आज चांदीच्या भावात १०० रुपयाची वाढ झाली आहे.त्यामुळे आज चांदीचा एक किलोचा भाव ७३,२०० रुपये इतका आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज