⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

सलग दुसऱ्या दिवशी सोने स्थिर, तर चांदी स्वस्त ; तपासा आजच्या १० ग्रॅमची किंमत

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जुलै २०२१ । जळगाव सराफ बाजारात आज आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर जैसे थे आहे. तर आज चांदीच्या दरात घट झाल्याचे दिसून आले आहे. आज चांदी प्रति किलो ३०० रुपयाने स्वस्त झाले आहे.त्यापूर्वी काल सोमवारी सोने आणि चांदी दर स्थिर होते.

मागील गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात चढ उतार दिसून आली. सध्या लग्नसराई जवळपास संपल्याने स्थानिक बाजारातही सोन्याला फारसा उठाव नाही. जून महिन्यात जवळपास सोन्याच्या दर २००० हजार रुपयाने स्वस्त झाले होते. 

परंतु जून महिन्याच्या शेवटी राज्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हायरसच्या वाढत्या रुग्ण संख्यामुळे पुन्हा निर्बंध लावण्यात आले होते. त्यामुळे जुलै महिन्याच्या सुरुवातीच पासून सोन्याच्या दरात पुन्हा वाढ होऊ लागली. 

मागील वर्षी देशभरात कोरोनाच्या प्रादुर्भावाचा सोन्याच्या दरावर चांगलाच परिणाम झाल्याचं दिसून  आले होते. गेल्या वर्षी ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याच्या भावाने प्रती १० ग्रॅमसाठी ५६ हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. तर चांदीच्या दराने देखील ७० हजाराचा टप्पा गाठला होता. त्यानंतर बाजारपेठ खुली होऊ लागल्याने सोन्याच्या दरात हळूहळू घट झाली.

 आजचा सोन्याचा दर

२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ४,८४९ रुपये इतका आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४८,४९० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम १ ग्रॅम चा दर ४६१८ रुपये असून १० ग्रॅमचा सोन्याचा भाव ४६,१८० रुपये आहे.

चांदीचा भाव

आज चांदी ३०० रुपयाने स्वस्त झाली आहे. त्यामुळे आज चांदीचा एक किलोचा भाव ७२,९०० रुपये इतका आहे.