⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

सोन्याची वाटचाल पुन्हा ५० हजारांकडे… शेअर मार्केटमधील मंदीमुळे सोन्यात तेजी…

जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२१ । देशातील वाढत्या कोरोना आकडेवारीमुळे शेअर मार्केटमध्ये चांगलीच पडझड होत आहे. याचा थेट फायदा सोन्याला होत असून सोन्याचा भावात चांगलीच वाढ होत आहे. सोने पुन्हा ५० हजारांकडे वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे.

२४ कॅरेट सोन्याचा भाव सध्या प्रति ग्राम ४,७८१ रुपये इतका असून त्यात २७ रुपयांची वाढ झाली आहे. एका तोळा म्हणजे १० ग्रामसाठी तुम्हाला ४७,८१० रुपये मोजावे लागतील. १० ग्राम सोन्याचा भावात २७० रुपयांची वाढ झाली आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्राम ४,५५३ रुपये इतका सुरु आहे. यात २५ रुपयांची वाढ झाली आहे. तर १० ग्रामचा भाव ४५ हजार ५३ रुपये इतका सुरु आहे. तो कालपेक्षा २५० रुपयांनी जास्त आहे.

सोने तेजीत असतांना चांदीत मात्र मंदी दिसून येत आहे. चांदीमध्ये प्रती किलो ३०० रुपयांनी घट झाली आहे. १ किलो चांदीचा दर जळगावात ७३ हजार ४०० रुपये इतका सुरु आहे. प्रति ग्राम ७३.४ रुपये इतका आहे.