⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | वाणिज्य | Gold Silver Rate : सोने-चांदीमधील घसरणीला ब्रेक, तपासा आजचा प्रति १० ग्रॅमचा दर

Gold Silver Rate : सोने-चांदीमधील घसरणीला ब्रेक, तपासा आजचा प्रति १० ग्रॅमचा दर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जून २०२२ । गेल्या दोन दिवसात सोने (Gold Price) आणि चांदी (Silver Price) दरात मोठी घसरण दिसून आली. मात्र अमेरिकन केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हच्या संभाव्य व्याजदर वाढीच्या पार्श्वभूमीवर आज सोने आणि चांदीच्या भावात पुन्हा वाढ झाली आहे. आज गुरुवारी १० ग्रॅम सोन्याच्या भावात २५० रुपयाची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चांदी तब्बल १२२० रुपये प्रति किलोने महागली आहे. यापूर्वी कालच्या सकाळच्या सत्रात सोने ४८० रुपयाने तर चांदी ८२० रुपयाने स्वस्त झाले होते.

जळगावचा आजचा सोने -चांदीचा दर? Gold Silver Rate Today
आज गुरुवारी सोन्याचा भाव ५१,६२० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. तर दुसरीकडे चांदी ६२,१२० रुपये प्रति किलोवर आली आहे. तुमच्या माहितीसाठी सोन्या-चांदीचे दर दिवसातून दोन वेळा बदलतात आणि त्यानुसार सराफा बाजारात सोन्या-चांदीचे भाव बदलतात.या बदलासह नवीन किंमतीत बाजारात सोन्या-चांदीची विक्री होते. शुद्धतेनुसार सोन्याच्या (Gold purity) किंमतीत पुन्हा बदल होतो. ग्राहकाला या नवीन दराप्रमाणे सोने-चांदी खरेदी करता येते.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

या 15 दिवसांत भावात चढउतार
सोन्याचे भाव १ जून पासून सातत्याने कमी जास्त होत आहेत. मे महिन्याच्या शेवटच्या दिवशी २४ कॅरेट सोन्याचे भाव ५२,११० रुपये होते. तर मे महिन्याच्या पहिल्या दिवशी सोन्याचे दर ५२,४६० रुपये प्रति १० ग्रॅम झाले. हा बदल गुंतवणुकदारांसाठी फायदेशीर ठरला. भावातील बदल गुंतवणुकदारांना सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन देणारा ठरला.

पुन्हा सोने चकाकले
दरम्यान ३ जून २०२० रोजी सोन्याचे दर दहा ग्रॅमसाठी ५२,४७० रुपयांवर पोहचले. त्यानंतर सोने १३ जून रोजी ५२,९०० पोहोचले होते. पण त्यानंतर सोन्याचे भाव पुन्हा पडले. सोन्याचे भाव १४ जून रोजी पडून ५१,८५० रुपयांवर येऊन पडले. म्हणजे एकाच दिवसात सोन्याचे दर तब्बल १०६० रुपयांनी कमी झाले. तर काल १५ जून रोजी ४८० रुपयांनी घसरून ५१,३०० रुपयांवर पोहोचले होते. तर जून महिन्याच्या पहिल्या तारखेपासून विचार करता सोन्याच्या दरात एकूण जवळपास ४५० रुपयांची वाढ झाली आहे. मागील दोन दिवसाच्या घसरणीच्या वेळीस सोने जवळपास ८५० रुपयांनी स्वस्त झाली आहे. तर चांदी सुमारे १९५० रुपयाने घसरली आहे.

गुंतवणुकीसाठी पारंपारिक पर्याय
भारतीयांच सोन्यावरील प्रेम जगजाहीर आहे. चीन खालोखाल भारतात सोन्याची खरेदी करण्यात येते. जर तुम्हीही सोन्यात गुंतवणूक करु इच्छिता तर सोन्यासारखा सोने हाच पर्याय आहे. सोन्यातील गुंतवणूक ही परंपरागत असून भारतीय लोक सोन्यात सर्वाधिक गुंतवणूक करतात.

या आठवड्यात सोन्याचे दर किती बदलले
१३ जून २०२२- रुपये ५२,९१० प्रति १० ग्रॅम
१४ जून २०२२ – रुपये ५१,८५० प्रति १० ग्रॅम
१५ जून २०२२ – रु ५१,३७० प्रति १० ग्रॅम

या आठवड्यात चांदीचा दर किती बदलला
१३ जून २०२२- रुपये ६३,३८० प्रति किलो
१४ जून २०२२ – रुपये ६१,७२० प्रति किलो
१५ जून मे २०२२- रुपये ६०,९०० प्रति किलो

अशी करण्यात येते शुद्धतेची तपासणी
ज्वेलरी शुद्धता तपासण्यासाठी एक पद्धत आहे. यामध्ये हॉलमॉर्कशीसंबंधित अनेक गोष्टी चिन्हांकित असतात. या चिन्हांच्या माध्यमातून दागिन्यांच्या शुद्धतेची ओळख ठरवली जाते. यामध्ये एक कॅरेटपासून 24 कॅरेटपर्यंतच्या सोन्याची शुद्धता ठरवण्यात येते.
22 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसाठी 916 चिन्हांकित करण्यात येते
21 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसाठी 875 चिन्हांकित असते
18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसाठी 750 लिहलेले असते
14 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 585 चिन्हांकन असते

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.