fbpx

आजचा सोने आणि चांदीचा भाव : १६ जून २०२१

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जून २०२१ । कोरोना नियंत्रण आणि सावरणार अर्थव्यवस्था यामुळे गुंतवणूकदारांनी कमॉडिटीमधून पैसे काढून घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सोने आणि चांदीममध्ये घट होतानाचे दिसून येत आहे. दरम्यान, आज बुधवारी सोन्याच्या भावात कुठलाही बदल झालेला नाहीय. मात्र, चांदी स्वस्त झाली आहे. आज चांदीच्या भावात ६०० रुपयाची घट झाली आहे. त्यापूर्वी काल सोने प्रति १० ग्रम २६० रुपयाने स्वस्त झाले होते तर चांदी ८०० रुपयाने स्वस्त झाली होती.

कोरोना लॉकडाऊन मध्ये काही अंशी सूट मिळताच सोने आणि चांदीच्या भावात मोठी हालचाली दिसून आल्या. मागील काही दिवसापासून दोन्ही धातूंमध्ये चढ-उतार दिसून आला आहे. त्यामुळे सोने पुन्हा ५० हजाराच्या दिशेने जातानाचे दिसून आले आहे. तर चांदी ७५ हजाराच्या पुढे गेले आहे.

mi advt

आजचा सोन्याचा भाव

२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ४,९०७ रुपये इतका आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४९,०७० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम भाव ४,६७३ रुपये इतका आहे. तर १० ग्रमसाठी तुम्हाला ४६,७३० रुपये मोजावे लागतील.

चांदीचा भाव

आज चांदीत घट दिसून आली आहे. आज चांदी ६०० रुपयांनी स्वस्त होऊन आज एक किलो चांदीचा भाव ७५,९०० रुपये आहे.

दरम्यान, केंद्र सरकारच्या आदेशानुसार 15 जूनपासून देशभरात सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग सक्तीच्या नियमाची अंमलबजावणी सुरु झाली आहे. त्यामुळे आता आपल्या जुन्या दागिन्यांना किंमत उरणार नाही का, या भीतीने अनेकजण धास्तावले आहेत. मात्र, या नियमामुळे लोकांनी फार घाबरुन जाण्याचे कारण नाही. कारण केंद्र सरकारने सोन्याच्या जुन्या दागिन्यांच्या हॉलमार्किंगचीही सोय उपलब्ध करुन दिली आहे. 

गेल्या पाच वर्षांमध्ये देशातील हॉलमार्किंग केंद्रांची संख्या 25 टक्क्यांनी वाढल्याचा सरकारचा दावा आहे. सध्याच्या घडीला देशातील 40 टक्के सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क असतो. देशातील एकूण हॉलमार्किंग केंद्रांची संख्या बघता वर्षभरात 14 कोटी दागिन्यांचे हॉलमार्किंग शक्य आहे. भारतात अंदाजे 4 लाख ज्वेलर्स आहेत. यापैकी केवळ 35,879 आस्थापने BIS सर्टिफाइड आहेत.

हॉलमार्किंगचा नियम लागू झाल्यानंतर तुमच्याकडे असलेल्या जुन्या दागिन्यांचे तुम्ही हॉलमार्किंग करू शकता. तुम्ही कोणत्याही हॉलमार्किंग सेंटरवर दागिन्यांचे हॉलमार्क करता येईल. पण जुन्या दागिन्यांच्या हॉलमार्किंगसाठी थोडे अधिक पैसे खर्च करावे लागतील. तसेच हॉलमार्किंग नसणारे दागिने विकल्यास तुम्हाला कमी पैसे मिळतील.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज