fbpx

सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ ; वाचा आजचा प्रति तोळ्याचा दर

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जुलै २०२१ । गेल्या काही दिवसांपासून चांदीच्या भावात सातत्याने चढ-उतार होत असल्याचं पहायला मिळतंय. सोन्याची किंमत पुन्हा हळूहळू वाढताना दिसत असून तिचा पन्नास हजारांकडे प्रवास सुरु झाला आहे. जळगाव सुवर्णबाजारात आज शुक्रवारी सलग पाचव्या दिवशी सोन्याच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. तर चांदी देखील वधारली आहे.

आज जळगाव सराफ बाजारात २२ कॅरेटच्या १० ग्रॅम सोन्याची किंमत २५० रुपयांनी वाढली. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव २७० रुपयांनी वाढला. तर चांदी प्रति किलो ५०० रुपयाने महागली आहे. त्यापूर्वी काल गुरुवारी २२ कॅरेटच्या १० ग्रॅम सोन्याची किंमत १०० रुपयांने तर २४ कॅरेट सोन्याचा भाव १०० रुपयांनी वाढला होता. तर चांदी प्रति किलो ५०० रुपयाने स्वस्त झाली होती.

सोमवारी सोन्याचा दर स्थिर होता. त्यानंतर मंगळवारी सोन्याच्या भावात ११० रुपयांची वाढ झाली तर बुधवारी त्यामध्ये १६० रुपयांची वाढ झाली होती. आणि गुरुवारी १०० रुपयांची वाढ झाली होती. गेल्या दोन महिन्यांमध्ये सोन्याच्या भावात घसरण झाल्याचं पहायला मिळालं होतं. पण येत्या काळात सोन्याची किंमत वाढण्याची शक्यता आहे असा अंदाज व्यक्त केला जातोय. त्यामुळे सध्या सोन्याच्या किंमती आवाक्यातील असून त्यामध्ये गुंतवणूक करण्याचा हाच योग्य काळ असल्याचं मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. 

गेल्या काही दिवसांपासून चांदीच्या भावात सातत्याने चढ-उतार होत असल्याचं पहायला मिळतंय. सोमवारी चांदीचा दर स्थिर होता. तर मंगळवारी चांदीच्या भावात २०० रुपयांची घटझाली होती तर बुधवारी आणि गुरुवारी चांदीच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली होती.  

आजचा सोन्याचा दर

२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ४,८६५ रुपये इतका आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४८,६५० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम १ ग्रॅम चा दर ४६३३ रुपये असून १० ग्रॅमचा सोन्याचा भाव ४६,३३० रुपये आहे.

चांदीचा भाव

आज चांदी ५०० रुपयाने महाग झाली आहे. त्यामुळे आज चांदीचा एक किलोचा भाव ७४,४०० रुपये इतका आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज