⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

आजचा सोने आणि चांदीचा भाव : १४ जून २०२१

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जून २०२१ । कोरोना लॉकडाऊन मध्ये काही अंशी सूट मिळताच सोने आणि चांदीच्या भावात मोठी हालचाली दिसून आल्या. मागील काही दिवसापासून दोन्ही धातूंमध्ये चढ-उतार दिसून आला आहे. त्यामुळे सोने पुन्हा ५० हजाराच्या दिशेने जातानाचे दिसून आले आहे. तर चांदी ७७ हजाराच्या पुढे गेले आहे.

दरम्यान, आज सोमवारी सोने आणि चांदीचा दर स्थिर आहे. आज दोन्ही धातूंमध्ये वाढ अथवा घट झाली नाही. त्याआधी काल रविवारी सोने प्रति १० ग्रम ३७० रुपयाने स्वस्त झाले होते तर चांदीच्या भावात ५०० रुपयाची वाढ झाली होती. 

आजचा सोन्याचा भाव 

२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ४,९३३ रुपये इतका आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४९,३३० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम भाव ४,७९८ रुपये इतका आहे. तर १० ग्रमसाठी तुम्हाला ४७,९८० रुपये मोजावे लागतील.

चांदीचा भाव

आज चांदीच्या भावात ५०० रुपयाची वाढ होऊन चांदीचा १ किलोचा भाव ७७,३०० रुपये आहे.