Gold-Silver Rate : सोने-चांदी पुन्हा महागली, जाणून घ्या १० ग्रॅम सोन्याचा भाव

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ डिसेंबर २०२१ । कोरोनाच्या (Corona Virus) नव्या ओमिक्रॉन (Omicron) विषाणूचे रुग्ण वाढत असल्याने गुंतवणूकदारांमध्ये आर्थिक अनिश्चितता वाढल्याने मौल्यवान धातूचे भाव वाढताना दिसून येत आहे. सलग दुसऱ्या दिवशी जळगाव सराफा बाजारपेठेत सोने (Gold Rate) आणि चांदीच्या (Silver Rate) भावात वाढ झाली आहे. आज १० ग्रॅम सोन्याच्या भावात १५० रुपयाची वाढ झाली आहे. तर चांदीच्या भावात ४५० रुपयाची वाढ झाली आहे.त्यापूर्वी काल सोने २३० रुपयाने तर चांदीचा ३६० रुपयांनी महागली होती.

आजचा सोने-चांदीचा भाव? (Gold-Silver Rate)

जळगाव सराफ बाजारात आज मंगळवारी २४ कॅरेट सोन्याचे भाव ४९,४४० रुपये नोंदवले गेले. चांदीचे दर किलोमागे ६३,०३० नोंदवले गेले. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ होते.

ऐन दिवाळीत सोन्याचे भाव वाढल्याचे दिसून आले. दिवाळीनंतर सोन्याच्या भावात तेजी दिसून आली होती. ११ नोव्हेंबर २०२१ ला सोन्याच्या दर ५० हजारांवर गेला होता. मात्र त्यानंतर सोन्याच्या भावात काहीसी घट दिसून आली. परंतु आता  ओमिक्रॉनमुळे (Omicron)सोने पुन्हा वरच्या दिशेने जाऊ लागले आहे. सध्या लग्नसराई सुरु असून यात दोन्ही धातूंच्या मागणी वाढली आहे. गेल्या आठवड्यात सोन्याच्या भावात ५५० रुपयाची वाढ दिसून आली तर दुसरीकडे चांदीच्या दरात ३४० रुपयाची घसरण दिसून आली.

असे होते मागील आठवड्यातील दर?

६ डिसेंबर (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,०३० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६२,९६० रुपये असा होता. ७ डिसेंबर (मंगळवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,०४० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६२,७१० रुपये इतका नोंदविला गेला. ८ डिसेंबर (बुधवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,१९० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६३,२८० रुपये इतका नोंदविला गेला. ९ डिसेंबर (गुरुवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,१८० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६३,०७० रुपये इतका नोंदविला गेला.१० डिसेंबर (शुक्रवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,०६० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६३,२२० रुपये इतका नोंदविला गेला.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -