सोने विक्रमी पातळीवरून ९००० रुपयांनी स्वस्त ; हे आहेत आजचे भाव

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑगस्ट २०२१ । आठवड्याच्या पहिल्या व दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या भावात मोठी घसरण पाहायला मिळाली. परंतु त्यानंतर सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगाव शहरातील सुवर्ण बाजारात आज सलग दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या भावात मोठी वाढ झाली आहे.

आज गुरुवारी सोने प्रति १० ग्रॅम ४४० रुपयाने महागले आहे. तर चांदी प्रति किलो १४० रुपयाने महागले आहे. त्यापूर्वी काल सोने प्रति १० ग्रॅम १०० रुपयापर्यंत वधारले होते तर चांदीत १० ते २० रुपयाची घसरण झाली आहे.

जळगाव सुवर्ण बाजारात मागील महिन्यापासून मोठी हालचाल दिसून येत आहे. ४ ऑगस्टपासून निर्बंधात सूट मिळाल्याने सुवर्ण बाजारात उलाढाल आणखी वाढली आहे. त्यामुळे गेल्या दोन आठवड्यापासून सोने आणि चांदीचे भावात मोठी चढ-उतार दिसून येत आहे.

जळगावच्या सुवर्ण बाजारात या महिन्याच्या १ ऑगस्टला सोने प्रति १० ग्रॅम दर ४९,४१० इतका होता. त्यात आता जवळपास २००० हजार रुपयापर्यंत घसरण झाली आहे. गेल्या वर्षापासून मोठी भाववाढ होऊन सोन्यापेक्षाही अधिक भाव झालेल्या चांदीच्या भावात अचानक मध्येच मोठी घसरण तर कधी मोठी भाववाढ होत असल्याचे दिसून येत आहे. १ ऑगस्टला चांदीच्या प्रति १ किलोचा ६९,८०० रुपये इतका होता. तो आता ५,५६० रुपयापर्यंत घसरण झाली आहे.

सोने विक्रमी उच्चांकडून 9,000 रुपयांनी स्वस्त?
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ५६,२०० च्या विक्रमी उच्चांकी पातळीवर पोहोचलं होतं. त्यानंतर यंदाच्या वर्षात सोन्याच्या किंमती खूपच अस्थिर असल्याचं पाहायला मिळतं. आता सोन्याच्या किंमती विक्रमी उच्चांकडून ९००० रुपयांनी घसरल्या आहेत.

आजचा जळगावातील सोन्याचा दर
२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ४७४८ रुपये इतका आहे तर १० ग्रॅम ४७,४८० रुपये आहे.

आजचा जळगावातील चांदीचा भाव
चांदीचा एक किलोचा भाव ६४,२४० रुपये इतका आहे.

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -