जळगाव लाईव्ह न्यूज । ११ सप्टेंबर २०२२ । मागील दोन तीन आठवड्यात सोन्याच्या भावात घसरण नोंदविली गेली होती. सोबतच चांदीही घसरली होती. मात्र या आठवड्यात सोन्याच्या भावासह चांदीही महागली असल्याची दिसून आलीय. या व्यापार सप्ताहात सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 107 रुपयांची वाढ झाली आहे, तर चांदीच्या दरात 1,337 रुपयांची वाढ झाली आहे.Gold Silver Price Today
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, या व्यावसायिक आठवड्याच्या सुरुवातीला (22 ते 26 ऑगस्ट) 24 कॅरेट सोन्याचा दर 50,770 होता, जो शुक्रवारपर्यंत वाढून 50,877 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. त्याच वेळी, 999 शुद्धतेच्या चांदीची किंमत 53,363 रुपयांवरून 54,700 रुपये प्रति किलो झाली आहे.
या आठवड्यात सोन्याचे दर किती बदलले
5 सप्टेंबर 2022 – 50,770 रुपये प्रति 10 ग्रॅम
6 सप्टेंबर 2022- 50,761 रुपये प्रति 10 ग्रॅम
7 सप्टेंबर 2022- 50,553 रुपये प्रति 10 ग्रॅम
8 सप्टेंबर 2022- 50,902 रुपये प्रति 10 ग्रॅम
9 सप्टेंबर 2022- 50,877 रुपये प्रति 10 ग्रॅम
या आठवड्यात चांदीचा दर किती बदलला
5 सप्टेंबर 2022- रुपये 53,363 प्रति किलो
6 सप्टेंबर 2022- रुपये 53,696 प्रति किलो
7 सप्टेंबर 2022- रुपये 53,396 प्रति किलो
8 सप्टेंबर 2022- रुपये 54,320 प्रति किलो
9 सप्टेंबर 2022- रुपये 54,700 प्रति किलो
जळगावमधील दर
जळगाव सराफ बाजारात 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव जवळपास 47,100 रुपये इतका आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव जवळपास 51,350 रुपायांपर्यंत आला आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)
सोन्यात आणखी घसरणार?
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरावर दबाव आहे. देशात आता सणासुदीला सुरुवात होणार आहे. अशा परिस्थितीत सोन्याची मागणी वाढते. मात्र, दिवाळीपर्यंत सोन्यात आणखी घसरण होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सध्या जागतिक परिस्थिती पाहता अल्पावधीत सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता कमी दिसत आहे.