⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

पाडव्यापूर्वी सोन्याची चमक फिकी; १०४ रुपयांनी भाव कमी : जाणून घ्या आजचा भाव

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२१ । पाडव्यापूर्वी सोन घ्यायचं असेल तर घेऊन घ्या; कारण सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. कालपेक्षा आज सोन्याचा भाव १०४ रुपयांनी कमी आहे.

जळगावातील सुप्रसिद्ध २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रामसाठी आजचा भाव ४६ हजार ९८० रुपये इतका आहे. २४ कॅरेटच्या एका ग्रामसाठी तुम्हाला ४,६९८ रुपये मोजावे लागतील.

२२ कॅरेट सोन्याचा प्रतिग्रॅम भाव ४, ४७४ इतका असून १० ग्रामचा भाव ४४ हजार ७४० रुपये इतका आहे. यात १०४ रुपयांची घसरण झाली आहे.

सोन्यासोबत चांदीच्या भावात देखील घसरण झाली आहे. १ किलो चांदीचा भाव ७१ हजार ७०० रुपये इतका असून प्रति ग्राम ७१.७ रुपये इतका आहे. चांदीचा भाव आज ४०० रुपयांनी कमी आहे.