fbpx

सोने सुसाट… पुन्हा एकदा ५० हजारांकडे वाटचाल…

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १० एप्रिल २०२१ । सोन्याच्या भावात तेजी येत असून सोन्याची पुन्हा एकदा ५० हजारांकडे वाटचाल सुरु आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे ज्यांच्या घरात लग्न आहेत अशांचे धाबे दणाणले असून सर्व बजेट कोलमडत आहे. कारण आपल्याकडे लग्नात सोन्यात अनन्य साधारण आहे.

जळगावात आज २४ कॅरेट सोन्याचा प्रती ग्राम भाव ४,७११ रुपये इतका असून १० ग्रामसाठी तुम्हाला हा ४७ हजार ११० रुपये मोजावे लागतील. कालपेक्षा सोन्याच्या भावात ३५२ रुपयांची आधी झाली आहे.

जर तुम्हाला २२ कॅरेट सोने घ्यायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला ४, ४८७ रुपये तर १० ग्रामसाठी ४४ हजार ८७० रुपये मोजावे लागतील. २२ कॅरेट सोन्याच्या भावात ३३६ रुपयांची वाढ झाली आहे.

सोन्याप्रमाणे चांदीदेखील ८०० रुपयाने महागली आहे. १ किलो चांदीचा भाव ७२ हजार १०० रुपये इतका झाला आहे. एक ग्राम चांदीचा भाव ७२.१ रुपये इतका आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज