fbpx
Jalgaon Live News | Latest Jalgaon News | Jalgaon News in Marathi

आजचा सोने चांदीचा भाव : ०७ जून २०२१

 जळगाव लाईव्ह न्यूज । ०७ जून २०२१ । गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेला सुवर्णबाजार सुरू करण्यास परवानगी मिळाल्यानंतर सोने-चांदी खरेदीत वाढ झाल्याने भावदेखील वधारले आहेत. निर्बंध शिथिल होताच चांदीचे भाव ७१ हजारांच्या पुढे गेले असून, सोनेदेखील ५० हजारांच्या दिशेने जात आहे.

गेल्या वर्षी कोरोनाचे संकट ओढवले असता सुरक्षित गुंतवणूक म्हणून अनेकांनी सोने, चांदी खरेदीकडे आपला ओढा वळवला. त्यामुळे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सोन्याचे दर उच्चांकी ५६ हजार रुपये या पातळीपर्यंत गेले होते.

आजचा सोन्याचा भाव

२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ४,९४९ रुपये इतका आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४९,४९० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम भाव ४,७१३ रुपये इतका आहे. तर १० ग्रामसाठी तुम्हाला ४७,१३० रुपये मोजावे लागतील.

 चांदीचा भाव

चांदीत गेल्या आठवड्यात मोठा बदल झालेला पाहायला मिळत आहे. आज चांदीच्या भावात ८०० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे आज चांदीचा १ किलोचा भाव ७१,६०० रुपये आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज