fbpx

सोने-चांदी खरेदी करण्याअगोदर जाणून घ्या आजचे नवीन दर

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ०७ जुलै २०२१ । गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचा दर एका विशिष्ट पातळीत वरखाली होताना दिसत आहे. जळगाव सराफ बाजारात जून महिन्यात मोठी घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. दरम्यान, काल मंगळवारी सोन्याच्या दरात घसरण झाली असता आज पुन्हा सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. आज बुधवारी २२ कॅरेटच्या १० ग्रॅम सोन्याची किंमत १०० रुपयांनी वाढली. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ११० रुपयांनी वाढला.  आज चांदीच्या दरात देखील घट झाली आहे. चांदी प्रति किलो १०० रुपयाने स्वस्त झाले आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सोने आणि चांदीमध्ये मोठे चढ उतार दिसून आले आहेत. गेल्या वर्षी ऑगस्ट २०२० मध्ये एमसीएक्सवर सोन्याचा भाव ५६२०० रुपयांच्या सार्वकालीन उच्चांकी स्तरावर गेला होता. त्यामुळे सध्या सोने सार्वकालिक उच्चांकापेक्षा ८५०० रुपयांनी स्वस्त भावात मिळत असून ते ४७ हजाराच्या घरात आले आहे. तर चांदीत मोठी हालचाल दिसून येत असल्याने आज चांदी ७५ हजार किलो पर्यंत आहे.

दरम्यान, जून महिन्यात सोन्याचे भाव कमी झाल्याचे दिसून आले. मात्र, जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून या मौल्यवान धातूंचे भाव पुन्हा वाढीस दिसून आले होते.  नजीकच्या काळात तो आणखी कमी होण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत.

आजचा सोन्याचा भाव

२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ४,७८६ रुपये इतका आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४७,८६० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम १ ग्रॅम चा दर ४५५८ रुपये असून १० ग्रॅमचा सोन्याचा भाव ४५,५८० रुपये आहे.

चांदीचा भाव

आज चांदी १०० रुपयाने स्वस्त झाली आहे. त्यामुळे आज चांदीचा एक किलोचा भाव ७४,९०० रुपये इतका आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज