सोने-चांदीच्या भावात मोठी घट ; जाणून घ्या आजचा जळगावातील दर

जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ जुलै २०२१ । कोरोनाची तीव्रता कमी होत असल्याने अर्थचक्र पुन्हा सुरळीत होण्याची अपेक्षा वाढली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्यामध्ये विक्रीचा सपाटा लावून गुंतवणूक काढून घेतली आहे. याचे पडसाद कमॉडिटी बाजार आणि सराफा बाजारावर उमटले आहेत. दरम्यान, जळगावातील सराफ बाजारात आज सोने आणि चांदीच्या दरात मोठी घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. आज सोने प्रति १० ग्रम २१० रुपयाने स्वस्त झाले. तर चांदी ४०० रुपयाने स्वस्त झाली आहे.

मागील काही दिवसांपासून जळगाव सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी चढ उतार दिसून आलीय. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात  ५६२०० रू.विक्रमी पातळीवर गेलेले सोने आता ४८ हजाराच्या आत आले आहे. आज दोन्ही धातूंमध्ये मोठी घट झाली आहे. त्यापूर्वी काल बुधवारी सोन्याचा दर स्थिर होते. तर चांदी ३०० रुपयांनी स्वस्त झाली होती.

आजचा सोन्याचा भाव

२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ४,७२८ रुपये इतका आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४७,२८० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम १ ग्रॅम चा दर ४५०३ रुपये असून १० ग्रॅमचा सोन्याचा भाव ४५,०३० रुपये आहे.

चांदीचा भाव

मागील गेल्या काही दिवसापासून चांदीच्या दरात देखील मोठी घट झाली आहे. आज चांदीच्या भावात ४०० रुपयाची घट झाली आहे. त्यामुळे आज चांदीचा एक किलोचा भाव ७२,९०० रुपये इतका आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज