जळगाव लाईव्ह न्यूज । १२ सप्टेंबर २०२१ । जळगाव सराफ बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली. आज सोमवारी सोने प्रति १० ग्रॅम २४० रुपयाने स्वस्त झालं आहे. तर चांदी प्रति किलो ६१० रुपयाने स्वस्त झालं आहे.
मागील काही दिवसापासून सोन्या आणि चांदीचे दर एका विशिष्ठ पातळीवरून वरखाली होतानाचे दिसून आलेय. गेल्या आठवड्यात सोन्याच्या भावात जवळपास ५०० रुपयांची घसरण झाली. मात्र दुसरीकडे चांदीच्या भावात मोठी पडझड दिसून आली.
देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर प्रति १० ग्रॅमसाठी ४३ हजारांपर्यंत खाली येऊ शकतात असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी सुगीचे दिवस येणार आहेत.
केंद्र सरकारच्या निर्णयानंतर आता सोने व्यापारी अगदी 2 लाखांपर्यंतच्या रोखीच्या व्यवहारांसाठीही KYC ची मागणी करु लागले आहेत. तसेच दोन लाखांपेक्षा कमी रकमेच्या व्यवहारासाठी ग्राहकांकडून पॅनकार्ड मागितले जात आहे.
सोने व्यापाऱ्यांना १० लाखापेक्षा अधिक रकमेच्या व्यवहारांचे तपशील ठेवणे बंधनकारक असणार आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास तीन ते सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
आजचा जळगावातील सोन्याचा दर
२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ४७९० रुपये इतका आहे तर १० ग्रॅम ४७,९०० रुपये आहे.
आजचा जळगावातील चांदीचा भाव
चांदीचा एक किलोचा भाव ६५,०८० रुपये इतका आहे.