⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

सोने दराने पुन्हा गाठली ५० हजारी, वाचा आजचे सोने-चांदीचे भाव

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जानेवारी २०२२ । कोरोना (Corona) महामारीच्या काळात गुंतवणूकदार बाजाराच्या अस्थिरतेचा सामना करत असल्यामुळे आजही सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून अनेकांचा सोने गुंतवणुकीकडे (Gold Investment) वाढता कल आहे. गेल्या काही दिवसांत सोने (Gold Rate) खरेदीत मागणी वाढली आहे. सोन्याच्या दैनंदिन बाजारभावावर त्याचा परिणाम दिसून येत आहे. जळगाव सराफ बाजारात आज पुन्हा एकदा सोने आणि चांदीच्या (Silver Rate) दरात वाढ झाली आहे. आज गुरुवारी सोने ३०० रुपयांनी महागले आहे. तर चांदी ११० रुपयांनी महागले आहे. सातत्याने होत असलेल्या सोने दराने ५० हजाराचा टप्पा गाठला आहे.

आजचा सोने आणि चांदीचा भाव : Gold Silver Rate
गुरुवारी जळगाव सराफ बाजारात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५०,००० इतका आहे. तर चांदीचा प्रति किलोचा भाव ६५,५७० रुपये इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ होते.

आर्थिक तज्ज्ञांचं भाकीत:

सोने गुंतवणूक सुरक्षिततेचा पर्याय मानला जातो. गेल्या आठवड्यात सोन्याच्या भाववाढीचा आलेख उंचावला होता. दरम्यान, सोने खरेदीकडे वाढता कल तसेच आगामी लग्नसराई व धार्मिक कार्यक्रमांमुळे अर्थतज्ज्ञांची सोने 55 हजारांचा टप्पा पार करणार असल्याचे भाकीत व्यक्त केले होते. दरम्यान, जळगाव सराफ बाजारात सोने वाढीचा आलेख चढताच राहिला आहे.

जळगाव बाजारात गेल्या आठवड्यात चांदीच्या दरात ४३०० रुपयांपर्यंतची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे सोने देखील महागले आहे. गेल्या आठवड्यात सोने ६१० रुपयाने महागले आहे. तर गेल्या १५ दिवसांमध्ये चांदी तब्बल ६ हजार रुपयांपर्यंत महागली आहे.

या आठवड्यातील असे होते दर?

सोने दर :
२४ जानेवारी (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,३८० रुपये प्रति तोळा
२५ जानेवारी (मंगळवार) ४९,७०० रुपये प्रति तोळा
२६ जानेवारी (बुधवारी) ४९,७०० रुपये प्रति तोळा
२७ जानेवारी (गुरुवारी) ५०,००० रुपये प्रति तोळा

चांदी दर:
२४ जानेवारी (सोमवार) चांदीचा दर ६६,३३० प्रति किलो
२५ जानेवारी (मंगळवार) चांदीचा दर ६५,४६० प्रति किलो
२६ जानेवारी (बुधवारी) चांदीचा दर ६६,३३० प्रति किलो
२७ जानेवारी (गुरुवारी) चांदीचा दर ६५,५७० प्रति किलो

सोन्याची शुद्धता कशी तपासायची
24 कॅरेट शुद्ध सोन्यावर 999 लिहिले आहे.
22 कॅरेटच्या दागिन्यांवर 916 लिहिले आहे.
21 कॅरेट सोन्याच्या ओळखीवर 875 लिहिले जाईल.
18 कॅरेटच्या दागिन्यांवर 750 लिहिले आहे.
14 कॅरेटच्या दागिन्यांवर 585 लिहिले आहे.

सूचना : सदर सोने आणि चांदीने दर हे ऑनलाईन आहे. तरी अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.

हे देखील वाचा :