जळगाव लाईव्ह न्यूज । २६ नोव्हेंबर २०२१ । जळगाव सराफ बाजार पेठेत आज सोन्याच्या किंचित घसरण दिसून आलीय. तर दुसरीकडे मात्र, चांदीच्या भावात वाढ दिसून आली. आज सलग दुसऱ्या दिवशी चांदीचा भाव वधारला आहे. आज १० ग्रॅम सोने तब्बल २० रुपयांनी स्वस्त झालं आहे. तर चांदी प्रति किलो ५३० रुपयांनी महागली आहे. त्यापूर्वी काल गुरुवारी सोन्याचा भाव स्थिर होता. तर चांदी १३० रुपयाची महागली होती.
आजचा सोने आणि चांदीचा भाव :
आज शुक्रवारी सोन्याचा १० ग्रॅमचा भाव ४८,५३० रुपये इतका आहे. तर चांदीचा प्रति किलोचा भाव ६४,६३० रुपये इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ होते.
काल गुरुवारी गुरुपुष्यामृत योग दिवस होता. या दिवशी मोठ्या प्रमाणावर सोने खेरदी केली जाते. मागील काही दिवसापासून सोन्याचे दर घसरत असल्याने सोने खरेदीची चांगलीच संधी ग्राहकांनी साधल्याचे दिसून आले. त्यातच लग्न सराई सुरु असल्यामुळे ग्राहकांनी गुरुवारी सोने खरेदीसाठीचा वेळ खास राखून ठेवल्याचे दिसून आले.
२२ नोव्हेंबर (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,९७० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६७,०९० रुपये असा होता. २३ नोव्हेंबर (मंगळवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,०५० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६६,०८० रुपये असा होता. २४ नोव्हेंबर (बुधवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,५५० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६३,९७० रुपये इतका आहे. २५ नोव्हेंबर (गुरुवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,५५० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६४,१०० रुपये इतका आहे. तर आज शुक्रवारी सोन्याचा १० ग्रॅमचा भाव ४८,५३० रुपये इतका आहे. तर चांदीचा प्रति किलोचा भाव ६४,६३० रुपये इतका आहे.
अशा प्रकारे तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता
आता तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. ‘बीआयएस केअर अॅप’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता.