खुशखबर…सोने-चांदीच्या भावात मोठी घसरण ; जाणून घ्या प्रति तोळ्याचा दर

gold silver price 23 november 2021

जळगाव लाईव्ह न्यूज । १० नोव्हेंबर २०२१ । ऐन सणासुदीत सोने आणि चांदीचे दर वाढत असल्याचे दिसून आले होते. परंतु मागील काही दिवसापासून या दरवाढीला ब्रेक लागला आहे. जळगाव सराफ बाजारात आज सलग दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या भावात मोठी घसरण झाली आहे. आज मंगळवारी १० ग्रॅम सोने तब्बल ९२० रुपयांनी स्वस्त झालं आहे. तर चांदी प्रति किलो १०१० रुपयांनी स्वस्त झाली आहे. त्यापूर्वी काल आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोने २४० रुपयाने तर चांदी ४३० रुपयांनी स्वस्त झाली होती.

आजचा सोने आणि चांदीचा भाव :

आज मंगळवारी सोन्याचा १० ग्रॅमचा भाव ४९,०५० रुपये इतका आहे. तर चांदीचा प्रति किलोचा भाव ६६,०८० रुपये इतका आहे.  दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ होते.

जळगाव सराफ बाजार पेठेत दिवाळीच्या पहिल्याच दिवशी धनत्रयोदशीला २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,७५० रुपये प्रति तोळा इतका होता तर  दुसरीकडे चांदीचा प्रति किलोचा भाव ६६,०५० रुपये इतका होता. त्यानंतर दोन्ही धातूंमध्ये वाढ होत राहिली. ११ नोव्हेंबर २०२१ रोजी सोन्याच्या दराने ५० हजाराचा टप्पा ओलांडला होता. तर चांदी प्रति किलो ६७ हजारांवर गेली होती. त्यानंतर दोन्ही धातूंमध्ये चढ-उतार दिसून आला.

सध्या सणासुदीचा हंगाम संपल्यानंतर आता लग्नसराई सुरू झाली आहे. त्यामुळे सोने-चांदीची मागणी पुन्हा वाढली आहे. असं असतानाही मागील गेल्या दोन दिवसापासून सोने आणि चांदीच्या भावात घसरण दिसून आली. गेल्या दोन दिवसात सोन्याच्या भावात ११६० रुपयाची घसरण झाली आहे. तर चांदीच्या भावात १४४० रुपयाची घसरण झाल्याची दिसून येतेय. दरम्यान, सोने आणि चांदीचे दर कमी होत असल्याने खरेदीदारांना खरेदीची ही चांगली संधी आहे.

गेल्या आठवड्यातील सोने-चांदीचे दर?

–१५ नोव्हेंबर (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ५०,४७० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६८,७२० रुपये असा होता.

-१६ नोव्हेंबर (मंगळवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ५०,४५० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६८,१२० रुपये असा होता.

– १७ नोव्हेंबर (बुधवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ५०,१९० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६७,७९० रुपये असा होता.

– १८ नोव्हेंबर (गुरुवार) दिवाळीच्या दिवशी २४ कॅरेट सोन्याचे दर ५०,४५० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६८,१९० रुपये असा होता.

– १९ नोव्हेंबर (शुक्रवार) दिवाळीच्या दिवशी २४ कॅरेट सोन्याचे दर ५०,२१० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६७,५२० रुपये असा होता.

– २० नोव्हेंबर (शनिवार) दिवाळीच्या दिवशी २४ कॅरेट सोन्याचे दर ५०,२१० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६७,५२० रुपये असा होता.

अशा प्रकारे तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता
आता तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अ‍ॅप बनवले आहे. ‘बीआयएस केअर अ‍ॅप’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज