⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

सोने-चांदी खरेदीपूर्वी वाचा आजचे भाव : २० नोव्हेंबर २०२१

जळगाव लाईव्ह न्यूज । २० नोव्हेंबर २०२१ । आंतराष्ट्रीय घडामोडीमुळे भारतीय सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या भावात चढ-उतार दिसून आली. जळगावात चालू आठवड्यात सोन्याच्या भावात किंचित घट झालेली दिसून आलीय. तर दुसरीकडे चांदीच्या भावात देखील काहीशी घट दिसून आली आहे. जळगाव सराफ बाजारात आज शनिवार १० ग्रॅम सोन्याचा भाव ५०,२१० रुपये इतका आहे. तर चांदी प्रति किलो ६७,५२० रुपये इतक्यावर आहे.

ऐन सणासुदीत जळगाव सराफ बाजारात सोन्याच्या भावात वाढ दिसून आली. महालक्ष्मी पूजनाच्या दिवशी सोन्याचा भाव ४८ हजारांवर होता. त्यानंतर देखील सोन्याच्या भावात जवळपास २ हजार रुपयांची वाढ झालीय. चांदी भावात देखील मोठी वाढ दिसून आली. ४ नोव्हेंबरला चांदीचा प्रति किलोचा भाव ६४ हजार रुपयापर्यंत होता. त्यात आजपर्यंत ३५०० रुपयाची वाढ दिसून आली आहे.

सध्या सणासुदीचा हंगाम संपल्यानंतर आता लग्नसराई सुरू झाली आहे. त्यामुळे सोने-चांदीची मागणी पुन्हा वाढली आहे. या आठवड्यात सोने दोन वेळा महागले तर तीन वेळा स्वस्त झालं आहे. तर दुसरीकडे चांदी देखील दोन वेळा महागले आहे तर तीन वेळा स्वस्त झालं आहे.

१५ ते १९ नोव्हेंबरपर्यंतचे दर 

–१५ नोव्हेंबर (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ५०,४७० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६८,७२० रुपये असा होता.

-१६ नोव्हेंबर (मंगळवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ५०,४५० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६८,१२० रुपये असा होता.

– १७ नोव्हेंबर (बुधवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ५०,१९० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६७,७९० रुपये असा होता.

– १८ नोव्हेंबर (गुरुवार) दिवाळीच्या दिवशी २४ कॅरेट सोन्याचे दर ५०,४५० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६८,१९० रुपये असा होता.

– १९ नोव्हेंबर (गुरुवार) दिवाळीच्या दिवशी २४ कॅरेट सोन्याचे दर ५०,२१० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६७,५२० रुपये असा होता.

अशा प्रकारे तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता
आता तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अ‍ॅप बनवले आहे. ‘बीआयएस केअर अ‍ॅप’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता.