Gold-Silver : खुशखबर…सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदीच्या भावात घसरण

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १० डिसेंबर २०२१ । एकीकडे कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉनमुळे (omicron) तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात यामुळे गुंतवणुकीदारांमध्ये अनिश्चितता पसरली आहे. यामुळे मागील काही दिवस कमॉडिटी बाजारात तेजी कायम दिसून आली. मात्र सलग दुसऱ्या दिवशी सोने (Gold) आणि चांदीच्या (Silver) भावात घसरण दिसून आली आहे. जळगाव सराफ बाजारात आज शुक्रवारी १० ग्रॅम सोने १२० रुपयाने स्वस्त झालं आहे. तर चांदी प्रति किलो ८५० रुपयाने स्वस्त झाली आहे.

आजचा जळगावातील सोने-चांदीचा भाव : Gold-Silver

आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी जळगाव सराफ बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव ४९,०६० रुपयांवर गेला आहे. तर चांदी ६२,२२० प्रति किलो इतक्यावर आला आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ होते.

गेल्या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉन हा करोनाचा घटक विषाणू आढळून आला होता. त्यानंतर त्याचा इतर देशांत प्रसार झाला. ओमिक्रॉनचे रुग्ण भारतात देखील आढळून आले होते. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण होते. आर्थिक अनिश्चितता वाढल्याने गुंतवणूकदारांनी सोने गुंतवणुकीला प्राधान्य दिले. त्यामुळे मागील काही दिवसात सोन्याच्या भावात वाढ दिसून आली होती.

६ डिसेंबर (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,०३० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६२,९६० रुपये असा होता. ७ डिसेंबर (मंगळवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,०४० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६२,७१० रुपये इतका नोंदविला गेला. ८ डिसेंबर (बुधवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,१९० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६३,२८० रुपये इतका नोंदविला गेला. ९ डिसेंबर (गुरुवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,१८० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६३,०७० रुपये इतका नोंदविला गेला.

ओमिक्रॉनची भीती वाढल्यास सोने आणि चांदी अधिक महाग
बाजार तज्ज्ञांच्या मते, कोविड ओमिक्रॉनच्या नवीन प्रकारांची भीती वाढल्यास सोने-चांदीच्या किमती आणखी वाढू शकतात. किंबहुना अर्थव्यवस्थेतील दबावाची चिन्हे पाहता गुंतवणूकदार अधिक सुरक्षित मानल्या जाणाऱ्या सोन्यातील गुंतवणूक वाढवतात. गेल्या वर्षी कोविडमध्येही असेच दिसून आले होते, जेव्हा भौतिक सोन्याची मागणी नसतानाही गुंतवणूकदारांच्या मागणीमुळे सोन्याच्या किमती सर्वकालीन उच्च पातळीवर पोहोचल्या होत्या.

सोन्याचा भाव कसा तपासाल?
आपण घर बसल्या सोन्याचे भाव (Know how to check Gold Rates) तपासू शकता. फक्त आपल्याला 8955664433 नंबरवर मिस्ड कॉल द्यावा लागेल. त्यानंतर आपल्या फोनवर मेसेज येईल, ज्यात ताजे भाव तपासता येतील.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -