जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मे २०२२ । आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. आज सोमवारी जळगाव (Jalgaon) सराफ बाजारात १० ग्रॅम सोन्याच्या किमतीत ४६० रुपायची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या किमतीत २१० रुपयाची वाढ झाली आहे. मागील गेल्या दोन आठवड्यात सोने-चांदीच्या किमतीत घसरण झाली होती.
परंतु आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे आणि देशांतर्गत झालेल्या बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार आज सोने आणि चांदीकडे वळले आहे. त्यामुळे सोने आणि चांदीने पुन्हा वधारू लागले आहे. आजच्या दरवाढीनंतर जळगाव सराफ बाजारात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५२,५५० रुपये इतका आहे. तर दुसरीकडे चांदीचा प्रति किलो ६४,०१० रुपये इतकी आहे.
गेल्या महिन्यात उच्चांक स्थरावर गेलेले सोने आणि चांदीचे दर आता पुन्हा निच्चांकी पातळीवर येऊ लागले आहे, गेल्या दोन आठवड्यात सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण दिसून आली. गेल्या १५ दिवसात सोने २१०० ते २२०० रुपयांनी स्वस्त झाले. तर दुसरीकडे चांदी किमतीत तब्बल ६ हजाराहून अधिकचे घट दिसून आली.
गेल्या एका आठवड्यात सोन्याचे दर किती बदलले
२ मे २०२२- रुपये ५२,९७० प्रति १० ग्रॅम
३ मे २०२२ – रुपये ५१,८५० प्रति १० ग्रॅम
४ मे २०२२ – रु ५२,००० प्रति १० ग्रॅम
५ मे २०२२- रु ५१,८०० प्रति १० ग्रॅम
६ मे २०२२- रु ५२,०९० प्रति १० ग्रॅम
७ मे २०२२- बाजार सुट्टी
८ मे २०२२- बाजार सुट्टी
गेल्या एका आठवड्यात चांदीचा दर किती बदलला
२ मे २०२२- रुपये ६५,०५०प्रति किलो
३ मे २०२२ – रुपये ६३,७४० प्रति किलो
४ मे २०२२- रुपये ६३,९५० प्रति किलो
५ मे २०२२- रुपये ६३,५७० प्रति किलो
६ मे २०२२- रुपये ६३,८०० प्रति किलो
७ मे २०२२- बाजार सुट्टी
८ मे २०२२- बाजार सुट्टी