खरेदीची सुवर्णसंधी…आज सोनं-चांदी तब्बल ‘इतक्या’ रुपयाने स्वस्त ; वाचा प्रति तोळ्याचा भाव

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑगस्ट २०२१ । आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीमध्ये मोठी घसरण झाली आहे.जळगाव सराफ बाजारात आज सोन्याच्या भावात ९९० रुपयाची तर चांदीच्या भावात तब्ब्ल २०५० रुपयाची घसरण झाली आहे.

कोरोना संकटातून सावरलेली अमेरिकन अर्थव्यवस्था आणि फेडरल रिझर्व्हने दरवाढीचे दिलेले संकेत यामुळे बडे गुंतवणूकदार सोन्यातून गुंतवणूक काढून घेत आहे.परिणामी कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीमध्ये मोठी पडझड होत आहे.

जळगाव सराफ बाजारात गेल्या या आठवड्यात सोन्याच्या दरात घट झाल्याचे दिसून आलेय. याआधी शुक्रवारी सोने २९० रुपयांनी स्वस्त झाले होते तर चांदीमध्ये ६२० रुपयांची घसरण झाली होती. या महिन्याच्या १ ऑगस्टला सोने प्रति दहा ग्रॅम दर ४९,४१० इतका होता. त्यात आता जवळपास १५०० हजाराहून अधिक रुपयाची घसरण झाली आहे.

गेल्या वर्षी कोरोना काळात मोठी भाववाढ झालेल्या सोने-चांदीत वर्षभरात तब्बल ८ हजार रुपयांनी घसरण झाली आहे. गेल्या वर्षी ७ ऑगस्ट रोजी ५७ हजार २०० रुपयांवर असलेले सोने सध्या ४८ हजारांवर, तर ७७ हजार ५०० रुपयांवर असलेली चांदी ६७ हजाराच्या घरात आले आहे.

आजचा जळगावातील सोन्याचा दर
२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ४७७३ रुपये इतका आहे तर १० ग्रॅम ४७,७३० रुपये असून त्यात आज ९९० रुपयाची घसरण झाली आहे.

आजचा जळगावातील चांदीचा भाव
चांदीचा एक किलोचा भाव ६६,५२० रुपये इतका आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -