⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

नवरात्रौत्सवात सोने खरेदी करताय? जाणून घ्या आजचा सोने-चांदीचा भाव

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑक्टोबर २०२१ । गेल्या काही दिवसापासून जळगाव सराफ बाजार पेठेमध्ये सोन्याच्या भावात मोठी हालचाल होत असल्याचे दिसून येतेय. काल (बुधवारी) सोन्याच्या भावात घसरण झाली असता मात्र, आज गुरुवारी सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या भावात आज देखील किंचित वाढ झाली आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पितृपक्ष संपल्यानंतर आजपासून नवरात्रीला सुरुवात झाली आहे. नवरात्रीमध्ये मागणी वाढणे अपेक्षित आहे. त्यामुळे सोन्याच्या किमतींना खालच्या पातळीवर आधार मिळू शकतो.

आज जळगाव सराफ बाजारात प्रति १० ग्रॅम सोन्याच्या भावात १६० रुपयाची वाढ झाली आहे. त्यामुळे आज प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर ४८,०१० रुपये इतका आहे. तर दुसरीकडे आज चांदी प्रति किलो १० रुपयाने महागली आहे. त्यामुळे चांदीचे (Silver) दर किलोमागे ६२,४३० रुपये इतका आहे. त्यापूर्वी काल बुधवारी १० ग्रॅम सोन्याच्या भावात १४० रुपयाची घसरण झाली आहे. तर चांदी प्रति किलो ४० रुपयाने महागली होती.

गेल्या काही दिवसापासून सोने आणि चांदीचा भाव एका विशिष्ट पातळीवरून वर-खाली होतानाचे दिसून येत आहे. गेल्या चार दिवसात सोने दोन वेळा महाग तर दोन वेळा स्वस्त झालं. गेल्या चार दिवसात सोन्याच्या भावात ७८० रुपयाची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या भावात आज सलग चौथ्या दिवशी वाढ झाली आहे. गेल्या चार दिवसात चांदीच्या भावात प्रति किलो १४५० रुपयाची वाढ नोंदविली गेली आहे.

जगातील अर्थव्यवस्था स्थिर प्रगती करीत असल्यामुळेच सामान्य माणसाचा कल आता शेअर बाजाराकडे वळलाय. त्यामुळेच सोन्याच्या किमतींवर दबाव कायम आहे. १ जानेवारी २०२१ ला प्रति १० ग्रॅम (२४ कॅरेट) सोन्याचा भाव ५१,३३० रुपये इतका होता. त्यात आतापर्यंत सोन्याच्या किमतीत प्रति १० ग्रॅम सुमारे ३३२० रुपयांनी घट झाली. तर या महिन्यात त्याची किंमत ४८,०१० रुपयांपर्यंत खाली आली. किमती घसरल्याने मागणीला आधार मिळाला. याशिवाय मोठे सण पुढे आहेत, त्यामुळे ज्वेलर्सनी सोने खरेदी केले आहे.

आता पुढे काय?

सोन्याची आयात वाढवण्याचा ट्रेंड ऑक्टोबरमध्येही कायम राहू शकतो. हा महिना दसरा आणि नंतर पुढचा महिना दिवाळी आहे. दरम्यान, सोने खरेदी करताना अनेक प्रसंग शुभ मानले जातात. या महिन्यात अधिक सोने आयात केले जाऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मागणी मजबूत राहील, त्यामुळे किमती वाढण्याची शक्यता आहे.

४ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबरपर्यंत असे होते सोने दर?

सोमवारी (४ ऑक्टोबर) २४ कॅरेट सोन्याचे दर ४७,३७० होते, त्यात ४० रुपयाची किरकोळ घसरण झाली होती. मंगळावारी (५ ऑक्टोबर) २४ कॅरेट सोन्याचे दर ४७,९९० इतका होता. त्यात काल ६२० रुपयाची मोठी वाढ झाली होती. बुधवारी (६ऑक्टोबर) २४ कॅरेट सोन्याचे (Gold) दर १० ग्रॅममागे ४७,८५० रुपये इतका आहे. तर आज (७ ऑक्टोबर) प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर ४८,०१० रुपये इतका आहे.

सोन्याची किंमत 57 हजार ते 60 हजार रुपयांपर्यंत जाणार
दिवाळी ते डिसेंबर पर्यंत सोन्याची किंमत 57 हजार ते 60 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते. म्हणजेच आता जे भाव चालू आहेत ते १२ ते १४ हजार प्रति १० ग्रॅम पर्यंत वाढू शकतात. जोपर्यंत चांदीचा प्रश्न आहे, त्यातही मोठी वाढ होऊ शकते. बहुतेक व्यापाऱ्यांचा असा विश्वास आहे की दिवाळीपर्यंत किंवा वर्षाच्या अखेरीपर्यंत चांदीचे दर ७६,००० ते ८२,००० रुपये प्रति किलो पर्यंत जाऊ शकतात.

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी ISO (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेट सोन्यावर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहिलेले असते. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट वापरतात. कॅरेट 24 पेक्षा जास्त नाही आणि कॅरेट जितके जास्त असेल तितके शुद्ध सोने म्हटले जाते.

सोने साठवणुकीबाबत नवे नियम
सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून अनेक जण सोने खरेदीला प्राधान्य देतात. गेल्या काही वर्षांत सोन्याचे दरही गगनाला भिडल्याने या सोन्याचे महत्त्व आणखी वाढले आहे. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये सरकारने सोने खरेदी, गुंतवणूक आणि त्याच्या साठवणुकीबाबत काही नवे नियम केले आहेत.

या नियमांचे पालन न केल्यास तुम्हाला कारवाईला सामोरे जावे लागू शकते. वास्तविक घरात सोने साठवण्यावर कोणतीही मर्यादा नाही. कायदेशीर मार्गाने खरेदी केलेले कितीही सोने नागरिक आपल्या घरात ठेवू शकतात. फक्त त्याचे पुरावे खरेदीदाराकडे असायला हवेत. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाच्या (सीबीडीटी) माहितीनुसार, नागरिक आपल्या घरात सोन्याचे कितीही दागिने बाळगू शकतात. मात्र, प्राप्तिकर विभागाकडून घरातील किंवा बँकेच्या लॉकरमधील सोन्याची तपासणी होऊ शकते. अशा तपासणीच्या वेळी सोन्याचा स्रोत तुम्हाला पुराव्यांसह सांगता आला पाहिजे