⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

आजचा सोनं-चांदीचा भाव ; ७ ऑगस्ट २०२१

जळगाव लाईव्ह न्यूज । ०७ ऑगस्ट २०२१ । आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोनं आणि चांदीच्या दर स्थिर दिसून आलं आहे. जळगाव सराफ बाजारात गेल्या या आठवड्यात सोन्याच्या दरात घट झाल्याचे दिसून आलेय. या महिन्याच्या १ ऑगस्टला सोने प्रति दहा ग्रॅम दर ४९,४१० इतका होता तो त्यात आता ६९० रुपयाची घसरण झाली आहे.

मागील काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या दरात मोठी पडझड दिसून येतेय. गेल्या वर्षी कोरोना काळात मोठी भाववाढ झालेल्या सोने-चांदीत वर्षभरात तब्बल ८ हजार रुपयांनी घसरण झाली आहे. गेल्या वर्षी ७ ऑगस्ट रोजी ५७ हजार २०० रुपयांवर असलेले सोने सध्या ४९ हजारांवर, तर ७७ हजार ५०० रुपयांवर असलेली चांदी ६९ हजार ५०० रुपयांवर आली आहे.

एक दिवसाच्या वाढीनंतर शुक्रवारी जळगाव सराफ बाजारात सोनं -चांदी स्वस्त झाली होती. काल सोने प्रति १० ग्रॅम २९० रुपयाने स्वस्त झालं होते. तर चांदी ६२० रुपयाने स्वस्त झाली होती.

आजचा जळगावातील सोन्याचा दर

२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ४८७२ रुपये इतका आहे तर १० ग्रॅम ४८,७२० रुपये असून त्यात आज २९० रुपयाची घसरण झाली आहे.

आजचा जळगावातील चांदीचा भाव

चांदीचा एक किलोचा भाव ६९,५७० रुपये इतका आहे.