⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

आजचा सोन-चांदीचा भाव : ४ सप्टेंबर २०२१

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ सप्टेंबर २०२१ । देशांतर्गत शेअर बाजारात तेजी आल्यामुळे सोने आणि चांदीच्या किमती घसरत आहेत. जळगाव सराफ बाजारात मागील गेल्या सलग चार ते पाच दिवसापासून दोन्ही धातूंच्या दरात घसरण झाल्याचे दिसून आले.

काल शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी जळगाव सराफ बाजारात सोनं ८० ते १०० रुपयांनी तर चांदीच्या भावात २३० रुपयाची घसरण झाली होती. त्यामुळे सोने दर ४८ हजाराच्या घरात आले आहे. ऐन सणासुदीत सोने दरात घसरण झाल्याने ग्राहकांसाठी मात्र खरेदीची संधी निर्माण झाली आहे.

जळगाव सराफ बाजारात गेल्या चार दिवसाच्या घसरणीनंतर सोने ५६० रुपयाने स्वस्त झालं आहे. तर चांदीच्या भावात मोठा बदल झालेला दिसून येतोय. गेल्या चार दिवसात चांदी ३ वेळा स्वस्त झाली. त्यात ९२० रुपयाने स्वस्त झाली आहे. तर काल गुरुवारी चांदीत ६७० रुपयाची वाढ झाली होती.

३० ऑगस्ट ते ३ सप्टेंबरपर्यंत सोने असे होते दर?

३० ऑगस्ट रोजी सोन्याची किंमत ३१० रुपयाची वाढ झाली होती,
३१ ऑगस्ट रोजी सोन्याची किंमत ३८० रुपयाने स्वस्त झाले होते.
१ सप्टेंबर रोजी सोन्याची किंमत ५० रुपयांनी कमी झाली होती.
२ सप्टेंबर रोजी सोन्याची किंमत ५० रुपयांनी कमी झाली होती
तर आज ३ सप्टेंबर रोजी सोन्याच्या भावात ८० ते १०० रुपयाची घसरण झाली आहे.

आजचा जळगावातील सोन्याचा दर
२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ४८०९रुपये इतका आहे तर १० ग्रॅम ४८,०९० रुपये आहे.

आजचा जळगावातील चांदीचा भाव
चांदीचा एक किलोचा भाव ६४,८३० रुपये इतका आहे.