fbpx

सोनं स्वस्त, तर चांदी महागली ; जाणून घ्या आजचा १० ग्रॅमचा भाव

जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑक्टोबर २०२१ । जळगाव सराफ बाजार पेठेमध्ये आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या भावात किंचित घट झाल्याचे दिसून आले आहे. मात्र, दुसरीकडे चांदीच्या भावात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. आज (४ ऑक्टोबर) प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर ४० रुपयाने स्वस्त झाले आहे. तर चांदी ९६० रुपये प्रति किलोने महागली आहे.

आजचा सोने आणि चांदीचा भाव

mi advt

सध्या जळगाव सराफ बाजार पेठेमध्ये प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर ४७,३७० रुपये इतका आहे. तर चांदीचे (Silver) दर किलोमागे ६१,९७० रुपये इतका आहे. दरम्यान, उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याचे दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. त्यामुळे जळगाव सराफ बाजारपेठेत देखील सोने आणि चांदीच्या भाव एका विशिष्ट पातळीवरून वर-खाली होतानाचे दिसून आले. गेल्या आठवड्यात सोन्याचे तीन वेळा स्वस्त तर दोन वेळा महागले आहे. त्यात सोन्याच्या दरात काहीसी वाढ झाल्याचे दिसून आले. तर दुसरीकडे चांदीच्या भावात घट झाल्याचे दिसून आले.

गेल्यावर्षी कोरोनाकाळात सोन्याने प्रतितोळा ५६,२०० रुपयांची उच्चांकी पातळी गाठली होती. या तुलनेत सोने सध्या ८८०० रुपयांपर्यंत स्वस्त झाले आहे. त्यामुळे ही सोने खरेदीसाठी चांगली संधी असल्याचे मानले जात आहे.

किमती अफाट वाढणार

दरम्यान, पुढच्या काही वर्षांत सोन्याच्या किमती आभाळाला टेकणार असल्याचा असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे. एचडीएफसी सिक्योरिटीजच्या तज्ज्ञांच्या मते, पुढच्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून देण्यात आले आहेत.

सप्टेंबर महिन्यात सोने-चांदीच्या भावात झाली घसरण

सप्टेंबर महिन्यात सोन्याच्या भावात किंचित घसरण झाल्याचे दिसून येतेय. १ सप्टेंबरला प्रति १० ग्रॅम सोन्याचा भाव ४८,२२० रुपये इतका होता तो आता १ ऑक्टोबर रोजी प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर ४७,३७० रुपये इतका आहे. तर सप्टेंबर महिन्यात चांदीच्या भावात मोठी घसरण झाल्याचे दिसून येतेय. मागील महिन्यात चांदीच्या भावात मोठी घसरण झाल्याचे दिसून येतंय. १ सप्टेंबरला चांदीचा प्रति किलोचा भाव ६४,३९० रुपये इतका भाव होता. तो आज ६१,९७० रुपये इतका आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज