⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

सोने-चांदीचा भाव ; जाणून घ्या आजचा जळगावातील दर

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मे २०२१ । कोरोना रुग्णवाढ आणि आर्थिक अनिश्चितता यामुळे गेल्या आठवड्यात सोन्याच्या किमतीत चढउतार दिसून आले. जळगावच्या सुवर्णबाजारात काल सोने चांदीच्या दरात वाढ झाली होती. त्यानंतर आज सोमवारी सोने आणि चांदीचे दर जैसे थे आहे. काल सोमवारी सोने प्रति १० ग्रम १५० रुपयानी तर चांदीचा दरात ११०० रुपयांची वाढ झाली होती.

कोरोनाच्या पार्श्वभूमी असलेल्या निर्बंधादरम्यान सुवर्णपेढ्या बंद असल्या तरी मल्टी कमोडिटी मार्केटमध्ये सोने-चांदीत खरेदी विक्री सुरू आहे. यामध्ये निर्बंध लागू झाल्यापासूनच सोने-चांदीचे भाव वाढत आले.

आजचा सोन्याचा भाव

२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ४,९४३ रुपये झाला आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४९,४३० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम भाव ४,७०८ रुपये इतका आहे. तर १० ग्रामसाठी तुम्हाला ४७,०८० रुपये मोजावे लागतील.

चांदीचा भाव 

तर चांदीच्या दरात आज मोठी वाढ झाली आहे. चांदीच्या आज ११०० रुपायाची वाढ होऊन ते प्रति १ किलो ७७,२०० रुपये इतका आहे.