⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

आजचा सोने आणि चांदीचा भाव : ३१ जुलै २०२१

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जुलै २०२१ । कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण वाढल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यातच फेडरल रिझर्व्हने नुकताच पार पडलेल्या बैठकीत आर्थिक पॅकेजला बगल दिल्याने गुंतवणूकदारांच्या चिंतेत भर पडली आहे. त्यांनी पुन्हा एकदा सोन्याकडे धाव घेतली आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत सोन्या-चांदीच्या दराला चांगलीच झळाळी आल्याचं दिसून आलंय.

सोन्याच्या दरामध्ये ३० जुलैला ७२० रुपये तर आज पुन्हा किरकोळ ५० रुपयापर्यंतची वाढ झाली आहे. जळगावात आज २४ कॅरेट एक तोळा सोन्याचा भाव हा ४९,४१० रुपये इतका आहे तर २२ कॅरेट सोन्याचा भाव हा ४७ हजाराच्या वर गेला आहे.

चांदीच्याही दरामध्ये ३० जुलैला १८५० रुपयांची तर आज पुन्हा १०० रुपयापर्यंतची वाढ झाली असून एक किलो चांदीसाठी आता ६९,८०० रुपये मोजावे लागणार आहेत.

गेल्या काही दिवसात सोन्याच्या दराने पुन्हा एकदा ५० हजारांकडे प्रवास सुरु केला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाचा सोन्याच्या दरावर चांगलाच परिणाम झाल्याचं दिसून आलंय. गेल्या वर्षी ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याच्या किंमतीने प्रती १० ग्रॅमसाठी ५६ हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. त्यामध्ये आता जवळपास ७ हजार रुपयांची घसरण झाल्याची पहायला मिळतंय.

अनेकांसाठी सोन्यात गुंतवणूक करणं हा सुरक्षित आणि हमी देणारा असा पर्याय आहे. सोन्यामध्ये पैसे गुंतवण्याला प्राधान्य देणाऱ्यांची संख्या अधिक आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरांत सातत्यानं होणारी घसरण पाहता गुंतवणूकदारांचा कल या पर्यायाकडे वाढला आहे.

चांदीच्या किंमतीचा विचार करता २७ जुलैला त्यामध्ये ९० रुपयांची वाढ झाली होती तर २८ जुलैला त्यामध्ये १०९० रुपयांची घसरण झाली होती. त्यानंतर २९ जुलैला ३५० रुपये तर ३० जुलैला १८५० रुपयांची वाढ झाली आहे.