Gold Silver Rate : सोने ५५ हजारांपुढे जाणार?, वाचा आजचा सोने-चांदीचा भाव

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ डिसेंबर २०२१ । जळगाव सराफ बाजारात आज सोन्याच्या घसरणीला अखेर ब्रेक लागला आहे. मागील गेल्या ४ दिवसापासून सोन्याच्या दरात किंचित का होईना पण घसरण झाल्याची दिसून आले. मात्र, आज आठवड्याच्या शेवटच्या आणि वर्षाच्या अखेरीस सोनीच्या दरात किंचित ५० रुपयाची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चांदी ३५० रुपयांनी महागली आहे. त्यापूर्वी काल सोने २१० रुपयांनी स्वस्त झालं होते; तर चांदी तब्बल ६९० रुपयांनी स्वस्त झालं होते. दरम्यान, २०२२ मध्ये सोने ५५ हजारांच्या पातळीपुढे जाणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

जळगावातील आजचा सोने-चांदीचा भाव?

आज शुक्रवारी जळगाव सराफ बाजारात १० ग्रॅम सोन्याचा दर ४९,०१० रुपये इतके आहे. तर चांदी प्रति किलो ६२,६२० रुपये इतके आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ होते.

भारतात सध्या ओमिक्रॉनसह कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. काल महाराष्ट्रात देखील कोरोनाचे 5 हजार 368 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. आगामी काळात वाढत्या रुग्ण संख्येने पुन्हा लॉकडाऊन लागण्याच्या भीतीने गुंतवणूकदार धास्तावले आहे. २०२२ मध्ये सोने ५५ हजारांच्या पातळीपुढे जाणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

आज वर्ष २०२१ चा अखेरचा दिवस आहे. या गेल्या वर्षभरात सोन्याच्या दरात मोठा बदल झालेला दिसून आला. १ जानेवारी २०२१ रोजा १० ग्रॅम सोन्याचा दर ५१,३३० इतका होता. तर दुसरीकडे चांदीचा प्रति किलोचा दर ६९,७०० रुपये इतका होता. म्हणजेच या वर्षाच्या उच्चांक पातळीवरून सोने जवळपास २ हजार रुपयांनी स्वस्त आहे. तर चांदी ३५०० हजार रुपयांनी स्वस्त आहे. या ३१ मे २०२१ रोजी सोन्याचा दर ४५ हजार रुपयांच्या घरात होता. तर दुसरीकडे मात्र चांदी ७४ हजार रुपयांच्या घरात होती. त्यानंतर पुन्हा सोने वाढीस लागले होते. तर चांदीत घसरण झाल्याचे दिसून आले.

या आठवड्यातील सोने चांदीचे दर?

२७ डिसेंबर (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,२५० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६३,७६० रुपये असा होता. २८ डिसेंबर (मंगळवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,१९० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६३,७६० रुपये इतका नोंदविला गेला. २९ डिसेंबर (बुधवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,१७० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६३,९८० रुपये इतका नोंदविला गेला. ३० डिसेंबर (गुरुवारी) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,९६० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६३,२९० रुपये इतका नोंदविला गेला.

अशी ओळखा सोन्याची शुद्धता
ISO (Indian Standard Organization) कडून सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी हॉलमार्क दिले जातात. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिलेले असते. बहुतांशे सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते. काही जण 18 कॅरेटची खरेदी करतात. मात्र, 24 पेक्षा जास्त कॅरेट नसतात. जितके जास्त कॅरेट सोने तितके शुद्ध असते.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar