⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

सोने-चांदीच्या भावात मोठी घसरण ; वाचा जळगावातील प्रति तोळ्याचा भाव

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑगस्ट २०२१ । आंतरराष्ट्रीय किमती घसरल्याने देशांतर्गत बाजारात सोने आणि चांदीचे भाव खाली आलेत. आज मंगळवारी जळगाव सराफ बाजारात सोने चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली.

आज सोमवारी जळगाव सराफ बाजारात सोने प्रति १० ग्रॅम ३८० रुपयाने स्वस्त झाले आहे. तर चांदी प्रति किलो ५८० रुपयाने स्वस्त झालीय. त्यापूर्वी काल सोने आणि चांदीच्या भावात वाढ नोंदविली गेलीय.

करोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर अर्थव्यवस्था हळुहळू रुळावर येत आहे. सणासुदीच्या हंगामात सराफांनी सोने खरेदीवर भर दिल्याने कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीच्या भावात तेजी दिसून आली आहे.  गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सोन्याचा भाव ५६२०० रुपयांपर्यंत वाढला होता. तर गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये चांदीचा भाव ७७८४० रुपयांच्या विक्रमी स्तरावर गेला होता. त्यात दोन्ही धातू सावरले आहे.

दरम्यान, जगाच्या अर्थव्यवस्थेत येणाऱ्या आर्थिक सुधारणांमुळे येत्या काही दिवसांत सोने आणि चांदीच्या किमती कमी होऊ शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

जर तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एसबीआयने (SBI)एक चांगली संधी आणली आहे. बँक ३० ऑगस्टपासून डिजिटल गोल्ड (Sovereign Gold Bonds) मध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय देत आहे, ही गुंतवणूक ३ सप्टेंबरपर्यंत चालू असणार आहे.

आजचा जळगावातील सोन्याचा दर

२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ४८२७ रुपये इतका आहे तर १० ग्रॅम ४८,२७० रुपये आहे.

आजचा जळगावातील चांदीचा भाव

चांदीचा एक किलोचा भाव ६४,५०० रुपये इतका आहे.