भारतात ‘ओमिक्राॅन’ची धास्ती? वाचा आजचा सोने-चांदीचा भाव

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ डिसेंबर २०२१ । जळगाव सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत आजही घसरण पाहायला मिळालीय.  आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोने आणि चांदीचं भावात मोठी घसरण झालीय. आज सोने ३७० रुपयाने स्वस्त झालं आहे. तर चांदी प्रति किलो ८३० रुपयाने स्वस्त झालं आहे. त्यापूर्वी काल सोने २० रुपयाने तर चांदी १९० रुपयाने घसरले होते. दरम्यान, भारतामध्ये कोरोनाच्या नव्या ‘ओमिक्राॅन’ वेरिएंटचे रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे याचा सराफ बाजारांवर परिणाम होईल का? हे येत्या काळात कळेल.

आजचा जळगावातील सोने-चांदीचा भाव :

आज शुक्रवार जळगाव सराफ बाजारात २४ कॅरेट दहा ग्रॅम सोन्याची किंमत ४८ हजार ३२० रुपयांवर आलीय. तर, चांदी ६२ हजार ०७० रुपये प्रति किलोनं विकली जात आहे.  दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ होते. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

आफ्रिकेत आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या ‘ओमिक्राॅन’ वेरिएंटमुळे ओमिक्राॅनचा जगभरात दहशत पसरली आहे. बड्या देशांनी ओमिक्राॅनचा फैलाव रोखण्यासाठी लाॅकडाऊनची तयारी सुरु केली आहे. यामुळे पुन्हा अर्थव्यवस्था संकटात जाईल या भीतीने गुंतवणूकदारांनी सोने आणि चांदीकडे धाव घेतली आहे. असं असलं तरी सोने आणि चांदीच्या भावात किंचित चढ-उतार दिसून येत आहे.

गेल्या पाच दिवसात जळगाव बाजार पेठेत सोने २ वेळा स्वस्त तर दोन वेळा महागले आहे. तर दुसरीकडे चांदीच्या भावात ४ वेळा घसरण दिसून आली आहे. गेल्या ५ दिवसात चांदीच्या भावात तब्बल २७६० रुपयाची घसरण दिसून आलीय. तर सोन्याच्या भावात किंचित घट झालेली आहे. सध्या लग्नसराईचा मोसम सुरु झाला आहे. त्यामुळे दागिन्यांची खरेदी वाढत आहे. त्यात आज सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे सोने चांदी खरेदीची हीच सुवर्णसंधी आहे.

दरम्यान, ‘ओमिक्राॅन’ वेरिएंटमुळे ओमिक्राॅनचा भारतात शिरकाव झाला असून कर्नाटकात दोन रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे भारताचे टेन्शन वाढले आहे.

२९ नोव्हेंबर (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,७०० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६३,५०० रुपये असा होता. ३० नोव्हेंबर (मंगळवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,७०० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६३,०८० रुपये असा होता. १ नोव्हेंबर (बुधवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,७२० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६३,०९० रुपये इतका आहे. २ नोव्हेंबर (गुरुवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,६९० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६२,९०० रुपये इतका आहे.  ३ नोव्हेंबर (शुक्रवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,३२० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६२,०७० रुपये इतका आहे.

सोन्याची शुद्धता कशी ओळखतात?

सोन्यावर हॉलमार्कचे चिन्ह आणि 999, 916, किंवा 875 असे अंक लिहलेले असतात. याच अंकावरून सोन्याची शुद्धता लक्षात येतं. हॉलमार्कच्या चिन्हाबरोबर 999 हा अंक असेल तर, सोने 24 कॅरेट असतं. 999 चा अर्थ असा आहे की, यामधील सोन्याची शुद्धता 99.9 टक्के आहे. 23 कॅरेट सोन्यावर 958, 22 कॅरेट सोन्यावर 916, 21 कॅरेट सोन्यावर 875 तर, 18 कॅरेट सोन्यावर 750 हे अंक असतात. सोनं जितकं जास्त कॅरेटचं तितकी त्याची गुणवत्ता चांगली. त्यामुळं त्याची किंमतही वाढत जाते. हॉलमार्क असणे ही सरकारी गॅरंटी असून ग्राहकांनी सोने खरेदी करताना त्यावर हॉलमार्क चिन्ह आहे का? याची तपासणी करावी आणि त्याची खरेदी करावी असं आवाहन केंद्रीय ग्राहक मंत्रालयाच्या वतीनं करण्यात आलंय

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -