⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

सोन्याचा भाव पुन्हा ४९ हजारांवर ; जाणून घ्या आजचा सोने-चांदीचा भाव

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑक्टोबर २०२१ । जळगाव सराफ बाजारात काल (बुधवारी) सोने आणि चांदीच्या भावात घसरण नोंदविली गेली होती. मात्र आज गुरुवारी सोने आणि चांदीचे भाव पुन्हा वाढले आहे. त्यामुळे सोन्याचा भाव पुन्हा ४९ हजारांवर गेला आहे. आज सोन्याच्या भावात प्रति १० ग्रॅम १६० रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या भावात प्रति किलो १८०रुपयाची वाढ नोंदविली गेली आहे.त्यापूर्वी काल प्रति १० ग्रॅम सोन्याच्या भावात ४०० रुपयाची घसरण झाली होती. तर चांदीचा प्रति किलोचा भाव ११८० रुपयाने घसरला होता.

आजचा सोने आणि चांदीचा भाव

जळगाव सराफ बाजारात आज गुरुवारी २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,०९० रुपये प्रति तोळा इतका आहे. दुसरीकडे चांदीचा प्रति किलोचा भाव ६६,६९० रुपये इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ होते.

तेजीमुळे मागील गेल्या १० दिवसात सोनं ७७० रुपयाने महागलं आहे. तर चांदीच्या भावात देखील मोठी वाढ झालीय. गेल्या १० दिवसात चांदी १९४० रुपयाची वाढ झालीय. दरम्यान, सोन्याच्या सध्याच्या किंमती पाहता, आता सोन्यात गुंतवणूक करायची की थांबवायची, असा प्रश्न गुंतवणूकदार आणि दागिने खरेदी करणाऱ्यांच्या मोठ्या वर्गासमोर आहे. तज्ज्ञांच्या मते, गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे.

गेल्या दिवाळीत सोन्याच्या प्रति तोळ्याचा भाव ५२,१२० इतका होता. त्यामुळे सोने रेकॉर्ड पातळीपेक्षा ३००० रुपयांनी स्वस्त मिळत आहे. परंतु दिवाळी ते डिसेंबरपर्यंत सोन्याची किंमत ५७ हजार रुपयांपासून ६० हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते. जोपर्यंत चांदीचा प्रश्न आहे, त्यातही मोठी वाढ होऊ शकते. बहुतेक व्यापाऱ्यांचा असा विश्वास आहे की, दिवाळीपर्यंत किंवा वर्षाच्या अखेरीपर्यंत चांदीचे दर ७६,००० ते ८२,००० रुपये प्रति किलोपर्यंत जाऊ शकतात.

या आठवड्यातील सोने दर?

सोमवारी (२५ ऑक्टोबर) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,९२० होते, त्यात ४०० रुपयाची वाढ नोंदविली गेली होती. मंगळावारी (२६ ऑक्टोबर) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,३३० इतका होता. त्यात ४४१० रुपयाची वाढ झाली होती. बुधवारी (२७ ऑक्टोबर) २४ कॅरेट सोन्याचे (Gold) दर १० ग्रॅममागे ४८,९३० रुपये इतका आहे.