⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

खुशखबर.. आज सोने-चांदीच्या किमतीत झाली मोठी घसरण ; नवे दर वाचले का?

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जानेवारी २०२२ । आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोने (Gold Rate) आणि चांदीच्या (Silver Rate) दरवाढीला ब्रेक लागला आहे. आज शुक्रवारी सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आज जळगाव सराफ बाजारात १० ग्रॅम सोन्याच्या दरात ९७० रुपयाची घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात २१७० प्रति किलो घट झाली आहे. त्यापूर्वी काल सोने ३०० रुपयांनी तर चांदी ११० रुपयांनी महागली होती. दरम्यान, आजच्या घसरणीने दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी चांगली संधी आहे.

आजचा सोने आणि चांदीचा भाव : Gold Silver Rate
शुक्रवारी ळगाव सराफ बाजारात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ४९,०३० इतका आहे. तर चांदीचा प्रति किलोचा भाव ६३,४०० रुपये इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ होते.

दरम्यान, जगातील सर्वच शेअर बाजार घसरल्याने भारतीय शेअर बाजारातही मोठी घसरण झाली. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये अस्थिरता निर्माण झाली असून सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून अनेकांचा सोने गुंतवणुकीकडे (Gold Investment) वाढता कल आहे. गेल्या काही दिवसांत सोने (Gold Rate) खरेदीत मागणी वाढली आहे. सोन्याच्या दैनंदिन बाजारभावावर त्याचा परिणाम दिसून येत आहे.

दरम्यान, सोने खरेदीकडे वाढता कल तसेच आगामी लग्नसराई व धार्मिक कार्यक्रमांमुळे अर्थतज्ज्ञांची सोने 55 हजारांचा टप्पा पार करणार असल्याचे भाकीत व्यक्त केले होते.

सराफ बाजारात नव्या वर्षाच्या सुरवातीपासूनच सोने आणि चांदीच्या दरात चढ-उतार सुरु आहे. परंतु गेल्यावर्षीच्या तुलनेत सोने स्वस्तच आहे. गेल्यावर्षी सोने दर ५० हजारांवर होता आहे. त्यानंतर एप्रिल २०२१ मध्ये सोन्याचा दर ४५ हजाराच्या घरात आला होता. त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सोने दर पुन्हा वधारताना दिसून आले. सणासुदीत देखील सोन्याच्या भावात तेजी दिसून आली होती. दिवाळीनंतर सोने ५० हजारावर गेले होते.

या आठवड्यातील असे होते दर?

सोने दर :
२४ जानेवारी (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,३८० रुपये प्रति तोळा
२५ जानेवारी (मंगळवार) ४९,७०० रुपये प्रति तोळा
२६ जानेवारी (बुधवारी) ४९,७०० रुपये प्रति तोळा
२७ जानेवारी (गुरुवारी) ५०,००० रुपये प्रति तोळा
२८ जानेवारी (शुक्रवार) ४९,०३० रुपये प्रति तोळा

चांदी दर:
२४ जानेवारी (सोमवार) चांदीचा दर ६६,३३० प्रति किलो
२५ जानेवारी (मंगळवार) चांदीचा दर ६५,४६० प्रति किलो
२६ जानेवारी (बुधवारी) चांदीचा दर ६६,३३० प्रति किलो
२७ जानेवारी (गुरुवारी) चांदीचा दर ६५,५७० प्रति किलो
२८ जानेवारी (शुक्रवार) चांदीचा दर ६३,४०० प्रति किलो

सोन्याची शुद्धता कशी तपासायची
24 कॅरेट शुद्ध सोन्यावर 999 लिहिले आहे.
22 कॅरेटच्या दागिन्यांवर 916 लिहिले आहे.
21 कॅरेट सोन्याच्या ओळखीवर 875 लिहिले जाईल.
18 कॅरेटच्या दागिन्यांवर 750 लिहिले आहे.
14 कॅरेटच्या दागिन्यांवर 585 लिहिले आहे.

सूचना : सदर सोने आणि चांदीने दर हे ऑनलाईन आहे. तरी अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.

हे देखील वाचा ;