fbpx

सोनं विक्रमी पातळीवरून ८००० रुपयांनी स्वस्त ; वाचा आजचा प्रति तोळ्याचा भाव

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑगस्ट २०२१ । नफावसुली आणि भांडवली बाजारातील तेजीचा फटका सोने आणि चांदीला बसत आहे. या गेल्या आठवड्यात सोने आणि चांदीच्या भावात एका विशिष्ट पातळीवरून वर-खाली होतानाचे दिसून आले. काल शुक्रवारी जळगाव सराफ बाजारात सोने प्रति १० ग्रॅम ६० रुपयाने महागले होते तर चांदीचा प्रति एक किलो ५७० रुपयाने महागली होती.

सराफ बाजारात सोने अजून विक्रमी पातळीच्या तुलनेत ८००० रुपयांनी स्वस्त आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सोन्याचा भाव ५६२०० रुपयांपर्यंत वाढला होता.

चांदीमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत प्रचंड घसरण झाली आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये चांदीचा भाव ७७८४० रुपयांच्या विक्रमी स्तरावर गेला होता. त्यात जवळपास १७००० रुपयांची घसरण झाली आहे.

जळगाव सराफ बाजारात १ ऑगस्ट २०२१ ला सोन्याच्या प्रति तोळ्याचा भाव ४९,४१० इतका होता. त्यात आतापर्यंत १०७० रुपयाने स्वस्त झाले आहे. तर चांदीचा भाव प्रति १ किलो ६९,८०० इतका होता. त्यात मोठी घट होऊन चांदी ५,६१० रुपयाने स्वस्त झालीय.

दरम्यान, जगाच्या अर्थव्यवस्थेत येणाऱ्या आर्थिक सुधारणांमुळे येत्या काही दिवसांत सोने आणि चांदीच्या किमती कमी होऊ शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

कोरोना महामारीच्या प्रभावानंतर, जगभरातील अर्थव्यवस्था सावरण्याचा प्रयत्न करीत आहे आणि त्यात सुधारणाही दिसून येत आहे. यूबीएसने सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना याबाबत सावध केले आहे.

आजचा जळगावातील सोन्याचा दर
२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ४८३४ रुपये इतका आहे तर १० ग्रॅम ४८,३४० रुपये आहे.

आजचा जळगावातील चांदीचा भाव
चांदीचा एक किलोचा भाव ६४,१९० रुपये इतका आहे.

या अ‍ॅपद्वारे सोन्याची शुद्धता तपासू शकता
तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर यासाठी सरकारने एक अ‍ॅप बनवले आहे. ‘बीआयएस केअर अ‍ॅप’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अ‍ॅपद्वारे आपण केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर आपण त्याच्याशी संबंधित कोणतीही तक्रार देखील करू शकता.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज