fbpx

सोने-चांदी पुन्हा एकदा झाले स्वस्त, वाचा आजचा प्रति १० ग्रॅमचा भाव

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ सप्टेंबर २०२१ । पितृ पंधरवडा सुरु झाल्यापासून सोने आणि चांदीची मागणी कमी झाली. त्याचे पडसाद कमॉडिटी बाजारावर उमटले.  जळगाव सराफ बाजार पेठेमध्ये आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीच्या भावात घसरण झाल्याचे दिसून आले आहे. आज प्रति १० ग्रॅम सोन्याच्या भावात ७० रुपयाची घसरण झाली आहे. तर चांदी प्रति किलो ८५० रुपयाने घसरली आहे. शुक्रवारी देखील सोने आणि चांदीच्या भावात मोठी घसरण झाली होती. सोने ६३० रुपयाने तर चांदी ४०० रुपयाने स्वस्त झाली होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याचे दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

सोन्या-चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून चढउतार कायम आहे. सोन्याचे दरामध्ये अधिकतर घसरणीचा कल आहे. जळगाव सराफ बाजार पेठेमध्ये आज (२७ सप्टेंबर) प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर ४७,०७० रुपये इतका आहे. तर चांदीचे (Silver) दर किलोमागे ६१,३६० रुपये इतका आहे.

mi advt

भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसात तेजी पाहायला मिळत आहे. शेअर मार्केटने पुन्हा एका इतिहास रचत ६० हजारांचा पल्ला गाठला आहे. सेन्सेक्स पहिल्यांदाच ६० हजारांच्या पार गेला आहे. शेअर बाजारात आणखी तेजी राहण्याचा अंदाज आहे. यामुळे गुंतवणूकदारांनी आपल्या गुंतवणुकीचा रोख आता शेअर बाजाराकडं वळवला आहे.

यामुळे कमॉडिटी बाजार फिका पडला आहे. एकीकडे शेअर्सचे भाव वाढत आहेत, तर सोन्याचे भाव घटत आहेत. शेअर बाजारातल्या तेजीचा लाभ घेण्यासाठी जगभरातले गुंतवणूकदार सोन्यातली गुंतवणूक काढून शेअर्समध्ये पैसे गुंतवत आहेत. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचे दर मोठ्या प्रमाणावर घसरत आहेत.

दरम्यान,सणासुदीच्या काळात सोन्याच्या दरात काही प्रमाणात घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यात सोने आणि चांदीच्या दरात घट झाल्याचे दिसून आले. तज्ज्ञांचे मते, येत्या काही दिवसांत सोन्याची किंमत ४३,००० रुपये प्रति दहा ग्रॅमपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने सोने-चांदीच्या भावात प्रचंड वाढ झाली होती. गेल्या वर्षी ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ५६२०० वर गेला होता. परंतु त्यात घसरण होऊन आता सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ४७,१४० रुपयांपर्यंत आला आहे.

मागील आठवड्यातील दर :

जळगाव सराफ बाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी (२० सप्टेंबर) २४ कॅरेट सोन्याचे दर ४७,०६० होते. तर मंगळावारी (२१ सप्टेंबर) वाढ होऊन २४ कॅरेट सोन्याचे दर ४७,३६० होते. तर आज बुधवारी (२२सप्टेंबर) २४ कॅरेट सोन्याचे (Gold) दर १० ग्रॅममागे ४७,७३० रुपये इतका आहे. गुरुवारी (२३ सप्टेंबर) २४ कॅरेट सोन्याचे (Gold) दर १० ग्रॅममागे ४७,७७० रुपये इतका आहे. तर शुक्रवारी (२४ सप्टेंबर) २४ कॅरेट सोन्याचे (Gold) दर १० ग्रॅममागे ४७,१४० रुपये इतका होता. शनिवारी  (२५ सप्टेंबर) प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर ४७,१४० रुपये इतका आहे. तर चांदीचे (Silver) दर किलोमागे ६२,२१० रुपये इतका आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज