आज सोनं स्वस्त चांदी महाग : ‘हे’ आहेत जळगावातले नवे दर

बातमी शेअर करा

 जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जुलै २०२१ । जळगाव सराफ बाजारात आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किमतीत किंचित घट झाली आहे. आज सोने ८० ते १०० रुपयांची घट झाली आहे. तर चांदीमध्ये जवळपास ९० रुपयांची वाढ झाली आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून सोन्याच्या भावात घसरण झाल्याचं पहायला मिळतंय. पण येत्या काळात सोन्याची किंमत वाढण्याची शक्यता आहे असा अंदाज व्यक्त केला जातोय. त्यामुळे सध्या सोन्याच्या किंमती आवाक्यातील असून त्यामध्ये गुंतवणूक करण्याचा हाच योग्य काळ असल्याचं मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. 

कोरोनाच्या प्रादुर्भावाचा सोन्याच्या दरावर चांगलाच परिणाम झाल्याचं दिसून आलंय. गेल्या वर्षी ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या भावाने प्रती 10 ग्रॅमसाठी 56 हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. त्यामध्ये आता जवळपास आठ हजार रुपयांची घसरण झाल्याची पहायला मिळतंय. 

कोरोनाचं संकट, लॉकडाऊन आणि नाईट कर्फ्यूसारखे नियम यामुळे अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे. त्यामुळे लोक पुन्हा एकदा सोन्यातील सुरक्षित गुंतवणुकीचा आधार घेत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचा दर एका विशिष्ट पातळीत वरखाली होताना दिसत आहे.  

जळगावातील सोन्याचा दर

२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ४,८५७ रुपये इतका आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४८,५७० रुपये इतका आहे.

जळगावातील चांदीचा भाव

चांदीचा एक किलोचा भाव ६८,६९० रुपये इतका आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -