आजचा सोने आणि चांदीचा भाव : २७ ऑगस्ट २०२१

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑगस्ट २०२१ । गेल्या काही दिवसापासून सोने आणि चांदीचे दर एका विशिष्ट पातळीवरून वर-खाली होतानाचे दिसून येतेय. आज जळगाव सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या भावात वाढ झाली आहे.

आज सोने प्रति १० ग्रॅम ६० रुपयाने महागले आहे. तर चांदीचा प्रति एक किलो ५७० रुपयाने महागली आहे. त्यापूर्वी काल गुरुवारी सोने ४५० रुपयाने तर चांदी २०० रुपयाने स्वस्त झाली होती.

कोरोना लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल होत आहेत. त्यामुळे बाजारपेठेतील व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. त्यामुळे सोने चांदीचे भाव वेगाने बदलत आहे. जळगाव सराफ बाजारात १ ऑगस्ट २०२१ ला सोन्याच्या प्रति तोळ्याचा भाव ४९,४१० इतका होता. त्यात आतापर्यंत १०७० रुपयाने स्वस्त झाले आहे. तर चांदीचा भाव प्रति १ किलो ६९,८०० इतका होता. त्यात मोठी घट होऊन चांदी ५,६१० रुपयाने स्वस्त झालीय.

गेल्या वर्षी ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याचा भाव ५६,२०० रुपये प्रती १० ग्रॅम इतका वाढला होता. मात्र मागील काही महिन्यात सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. त्यामुळे सोन्याचा भाव गडगडला.

आजचा जळगावातील सोन्याचा दर
२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ४८३४ रुपये इतका आहे तर १० ग्रॅम ४८,३४० रुपये आहे.

आजचा जळगावातील चांदीचा भाव
चांदीचा एक किलोचा भाव ६४,१९० रुपये इतका आहे.

या अ‍ॅपद्वारे सोन्याची शुद्धता तपासू शकता
तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर यासाठी सरकारने एक अ‍ॅप बनवले आहे. ‘बीआयएस केअर अ‍ॅप’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अ‍ॅपद्वारे आपण केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर आपण त्याच्याशी संबंधित कोणतीही तक्रार देखील करू शकता.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -