जळगाव लाईव्ह न्यूज । २५ सप्टेंबर २०२१ । आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना देशांतर्गत बाजारात सोने आणि चांदीच्या दरात चढ-उतार दिसून आलीय. जळगाव सराफ बाजार पेठेमध्ये या आठवड्यात सोन्याच्या भावात किंचित घट झाल्याचे दिसून आले. आज (२५ सप्टेंबर) २४ कॅरेट सोन्याचे (Gold) दर १० ग्रॅममागे ४७,१४० रुपये इतका आहे. त्याचबरोबर चांदीच्या किमतीतही काहीशी घट झाली असल्याची दिसून येत आहे. आज चांदीचे (Silver) दर किलोमागे ६२,२१० रुपये इतका आहे.
दरम्यान, भारतासहित जगभरातल्या शेअर बाजारांत सध्या मोठी तेजी आहे. सेन्सेक्स, निफ्टी तर रोज विक्रमी वाढ नोंदवत आहेत. काल शुक्रवारी सेन्सेक्सने ६०,००० अंकांचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला. शेअर बाजारात आणखी तेजी राहण्याचा अंदाज आहे. यामुळे गुंतवणूकदारांनी आपल्या गुंतवणुकीचा रोख आता शेअर बाजाराकडं वळवला आहे.
यामुळे कमॉडिटी बाजार फिका पडला आहे. एकीकडे शेअर्सचे भाव वाढत आहेत, तर सोन्याचे भाव घटत आहेत. शेअर बाजारातल्या तेजीचा लाभ घेण्यासाठी जगभरातले गुंतवणूकदार सोन्यातली गुंतवणूक काढून शेअर्समध्ये पैसे गुंतवत आहेत. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचे दर मोठ्या प्रमाणावर घसरत आहेत. तज्ज्ञांचे मते, येत्या काही दिवसांत सोन्याची किंमत ४३,००० रुपये प्रति दहा ग्रॅमपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे.
या आठवड्यात जळगाव सराफ बाजारात सोन्याचे दर तीन वेळा महागले तर दोन वेळा स्वस्त झाले आहे. गेल्या पाच दिवसात सोने जवळपास ७३० रुपयाने स्वस्त झाले आहे. तर चांदी गेल्या पाच दिवसात २ वेळा महागली तर ३ वेळा स्वस्त झाली आहे. गेल्या पाच दिवसात चांदीच्या भावात १९०० रुपयांपर्यंतची घसरण झालीय.
दरम्यान, कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने सोने-चांदीच्या भावात प्रचंड वाढ झाली होती. गेल्या वर्षी ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ५६२०० वर गेला होता. परंतु त्यात घसरण होऊन आता सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ४७,१४० रुपयांपर्यंत आला आहे. उच्चांक दरापासून सोने दर ९००० रुपयांपेक्षा जास्त दराने स्वस्त मिळत आहे. तज्ज्ञांच्या मते सोनं गेल्यावर्षीपेक्षा स्वस्त दराने मिळत असल्याने सध्या गुंतवणुकीची चांगली संधी आहे.
२० ते २४ सप्टेंबरपर्यंत असे होते सोन्याचे दर :
जळगाव सराफ बाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी (२० सप्टेंबर) २४ कॅरेट सोन्याचे दर ४७,०६० होते. तर मंगळावारी (२१ सप्टेंबर) वाढ होऊन २४ कॅरेट सोन्याचे दर ४७,३६० होते. तर आज बुधवारी (२२सप्टेंबर) २४ कॅरेट सोन्याचे (Gold) दर १० ग्रॅममागे ४७,७३० रुपये इतका आहे. गुरुवारी (२३ सप्टेंबर) २४ कॅरेट सोन्याचे (Gold) दर १० ग्रॅममागे ४७,७७० रुपये इतका आहे. तर शुक्रवारी (२४ सप्टेंबर) २४ कॅरेट सोन्याचे (Gold) दर १० ग्रॅममागे ४७,१४० रुपये इतका होता.